जाखुरीत जाखूआई यात्रा उत्सवास मंगळवार प्रारंभ
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथील जागृत देवस्थान श्री जाखुआई मातेच्या यात्रा उत्सवास मंगळवार दिनांक १६/०४/२०२४
पासून प्रारंभ होत आहे. या उत्सवा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. नवसाला पावणारी श्री जाखूआई माता अशी ख्याती असलेल्या या देवस्थानात जिल्हाभरातून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. मंगळवारी सकाळी ८ वाजता होम हवन करून देवीची महाआरती होणार आहे. दिवसभरात देवीला नैवेद्य, नारळ, पेढा, ओटी भरण, गुळाची शेरनी, असा प्रसाद चढविला जातो. ज्या भाविक भक्तांनी वर्षभरात केलेला नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त येत असतात, रात्री ८ वाजता छबिना मिरवणूक काढण्यात येणार असून फटाक्यांची आतिषबाजीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात येणार आहे.
सनई चौघडा या पारंपारिक वाद्य पद्धतीने निघालेला मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात.
त्यानंतर देवीच्या मंदिरासमोर फटाक्याची आतिषबाजी होऊन मिरवणुकीची सांगता होणार आहे. रात्री ९.००ते ९.३० देवीचा गोंधळ
रात्री ९.३० वाजता
मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशा चा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता हजेरीचा कार्यक्रम होईल तर सायंकाळी ४ वाजता कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार आहे. तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान यात्रा कमिटी व जाखूआई देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. यात्रा उत्सवानिमित्ताने जाखू आई मातेच्या मंदिरासह गावातील सर्व मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. दरम्यान यावर्षीचे यात्रेचे मुख्य आकर्षण सर्वांसाठी सर्वात उंच पाळणा, ब्रेक डान्स, लहान मुलांसाठी, बलून, रेल्वे, मोटार गाडी, अशा विविध नाविन्य खेळ आयोजित केला आहे. त्यामुळे या सर्व गोड कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी आनंद घ्यावा असे आव्हान जाखूआई ट्रस्ट , जाखुरी ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
