अंभोरे येथील अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याचे कीर्तनाने उत्साहात सांगता !..
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे सालाबाद प्रमाणे पुर्वापार चालत आलेली सप्ताहाची परंपारा आज ही चालू आहे.सप्ताहास प्रारंभ वार गुरुवार दि.११/४/२०२४ रोजी घट स्थापना,श्री.विठ्ठल-रुख्मिणी मूर्तीची दुग्धभिषेक,स्नान,विधिवत पुजा करुन करण्यात आले.हा सप्ताह सात दिवसाचा असुन सातही दिवस दिवस रात्र हरिनामाचा जागर करण्यात आला.सकाळी पहाटे काकड आरती,सकाळी ते रात्री अखंड पणे वीणा वाजवून पहारा देत असे.तसेच सायंकाळी हरीपाठ आणि रात्री महाराष्ट्रातील नामांकीत कीर्तनकार महाराजांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले.कीर्तन समारोपानंतर अंभोरे ग्रामस्थ,युवक,तरुण यांचे कडून भव्य महाप्रसादाचे (पंगतीचे)आयोजन करुन उपस्थित पुरुष,महिला,तरुण युवक,युवती या सर्वांना महाप्रसादाचे वितरण केले जात.सात दिवस सप्ताह काळात हरिनामाचे गजराने संपुर्ण परिसर भक्तीच्या सागरात तल्लीन होत.सप्ताहाचे पहिले पुष्प राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचे दत्त पावन आश्रम अंभोरे येथिल प.पु.निळ कंठ गिरी महाराज,प.पु.कपिल महाराज यांचे प्रवचनाने झाले दुसरे पुष्प ह.भ.प.कुमारी सोडणर ताई यांचे कीर्तन सेवेतून झाले.तिसरा दिवसाचे पुष ह.भ.प.समाज प्रबोधनकार रमेश महाराज तांबडे चवथे पुष्प कडीत येथिल बालकीर्तनकर कुमारी वाडीतके ताई यांनी कीर्तन सेवा केली.पाचवे पुष्प संगमनेर येथिल हारदे महाराज आश्रमातील ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी कीर्तन सेवा केली.सहाव्या दिवसाचे पुष्प ह.भ.प.थोरात महाराज यांनी कीर्तन सेवा केली.सातव्या दिवसाचे पुष्प ह.भ.प.वेदचार्य ह.भ.प.प्रकश महाराज आव्हाड यांचे कीर्तनाने सेवा केली.सातही दिवस कीर्तनकरानी अमृतवाणीतून संताचा महिमा,संताने केलेले संपुर्ण समाजासाठीचे अध्यात्माचे कार्य किती महान आहे हे संताचे विविध अभंग,संतवाणी यातील काही ओवी,चरण घेऊन त्याचा भावार्थ,महत्व अगदी साध्या सरळ भाषेत समजेल अशा भाषेत दिले.सातही दिवस अंभोरे आणि पंचक्रोशितील ग्रामस्थ,पुरुष, महिला,तरुण युवक,युवती सर्वांनी या ज्ञानअमृताचा लाभ घेतला.आज गुरुवार या सप्ताहाचा अखेरचा दिवस आजच्या दिवशी सकाळी १० वाजता श्री.संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम वेल्हाळे येथिल प.पु.मुक्तानंद गिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले .त्यांनी सातही दिवस जी कीर्तन सेवा पार पडली त्या कीर्तन सेवेचा पुर्ण सार त्यांच्या वानीतून विषद केला.
अमृतवानीतुन समाज आज अध्यात्मापासुन,धर्मापासुन दुर चालला जात आहे.धर्माचे संरक्षण करण्याची जबाबदारी आजच्या तरुण युवकांची आहे.परंतु आजची तरुण पिढी ही व्यसनाचे अधिन होत चालली असुन या तरुणाईकडे खुप लक्ष देण्याची,चांगले संस्कार घडविण्याची जबाबदारी जेष्ठ,वडीलधारी,तसेच आई -वडिलांची आहे.कारण व्यसना मुळे मृत्यूचे प्रमाण वाढत चालले असुन आज वडिलांना आपल्या मुलाचा मृत्यु आपले समोर बघण्याची वेळ येते ही खुप मोठी खेदाची गोष्ट आहे.पुर्वी जे काही रामायण,महाभारत घडले हे आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायक आहे.त्यातुन चांगले ज्ञान घेवुन आजच्या तरुण युवकांनी आपले अनमोल असे मिळालेले मनुष्यरुपी शरीर सदृढ ,चांगले ठेवुन जिवन सार्थी लावावेत.महाराष्ट्र ही साधु-संताची भुमी आहे.त्यातील आपला अहमदनगर जिल्हा साधु-संतासाठी एक मोठी पर्वणी होय.महाराष्ट्रात वारकरी शिक्षण संस्थेचा पाया श्री.संत जोग महाराजांनी घातला.त्याचा वारसा चालविण्याचे अर्थात वारकरी शिक्षण संस्था रुपी लावलेल्या छोट्या वृक्षांचे मोठ्या वटवृक्षांत रुपांतर झाले ते महान विभूती,संत आपले अंभोरे गावचे सुपुत्र ह.भ.प.लक्ष्मण महाराज खेमनर (इगतपुरी) होय.आपले अंभोरे गावची ओळख ह.भ.प.लक्ष्मण महाराज यांचे नावाने महाराष्ट्रात सर्व दुर पोहचली आहे. आहे.त्यामुळे अंभोरे गावाची उंची वाढली आहे.संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत एकनाथ महाराज,संत चोखोबा,संत जनाबाई,संत मिराबाई अशा किती तरी संतानी आपले जिवन समाजासाठी समर्पित केले आहे.त्यांची असलेली निस्सीम भक्ती,त्याग,वैराग्य,निस्वार्थी वृती हे गुण असल्यामुळेच संत म्हणून उदयास आले.आपल्या आणि संपुर्ण जगाचे कल्याणासाठी हे महान-थोर संत या भूतलावावर अवतरले आहे.म्हणून परमेश्वरावर शुध्द भाव,श्रद्धा ठेवा तरच भक्तीतुन भाव प्रगट होईल.आपले मुलांसमोर आपले आई -वडिलांची सेवा करा,साधु-संताची,गो-मातेची,सेवा करा,वडिल-धारी माणसांचा सन्मान राखा,भजन-पूजन करुन अध्यात्माची कास धरा त्यातुन निश्चितच आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही.यावेळी संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पा.व प्रक्रिया संघाचे चेअरमन सन्माननीय रणजितसिंह देशमुख साहेब यांनी प.पु.मुक्तांंनंद गिरी महाराजांचा सन्मान केला.आभार व्यक्त करतांना श्री रणजितसिंह देशमुख साहेब यांनी सप्ताह काळात अंभोरे गाव जणु काही प्रति पंढरपूर बनले होते.कारण दररोज अडीच ते तिन हजार ग्रामस्थ,महिला,पुरुष,तरुण युवक,युवती मोठ्या संख्खेने उपस्थित राहुन या अमृतमय ज्ञानामृताचा लाभ घेत होते त्यानिमीत्ताने ग्रामस्थ,युवक,व्यवसायिक प्रत्येकानी महाप्रसाद,अन्नदान पगंतीमध्ये सहभाग घेऊन आपल्या या सप्ताहाची चांगली ओळख निर्माण करुन पंचक्रोशीत पोहचविण्याचे काम केले त्यामुळे गावचे नावलौकिकात भर पडली आहे.सर्व आप-पसातिल मतभेद विसरुन एक धार्मिक कार्यात एकत्र आलात असेच कायम एकत्र रहा.मला सुध्दा धार्मिक कार्याची आवड असुन समाज कारण,राजकारण करत असतांना जर खरोखर काही मनापासून चांगले करण्याची इच्छा असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही.हे सर्व करुन घेण्यासाठी परमेश्वराची छाया आपणास हवी आहे.तिच शक्ती आपणास परमेश्वराकडून मिळते आणि हिच अदृश्य शक्ती आपले मनातील किंवा आपणास अभिप्रेत असलेले कार्य निर्विघ्नपणे पार पाडते.त्यासाठी आपण अध्यात्मांकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघुन ते अंगीकारावे असे नम्र आवाहन केले.सप्ताह यशस्वी करण्यासाठी अंभोरे,मालुंजे,डीग्रस, कोळवाडे,नागापुरवाडी पंचक्रोशितील भजनी मंडळाचे विशेष सहकार्य लाभले.तसेच सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,विकास सोसायटीचे चेअरमन-व्हाईस चेअरमन,सर्व सन्माननीय संचालक मंडळ व प्रमुख पदाधिकारी,ग्रामस्थ,युवक यांचे देखील अनमोल सहकार्य लाभले.सप्ताह अखेरच्या दिवशी मोठ्या संख्खेने ग्रामस्थ,महिला,युवक उपस्थित होते.
