शिर्डी मतदार संघाची मेकर- टेकर उत्कर्षा रूपवते ; नया खेल , नया खिलाडी, नया राज

संगमनेर / लोकवेध live न्यूज / भारत रेघाटे

राजकारण म्हटलं की साम-दाम-दंड-भेद या साधनाचा वापर करून स्वार्थी राजकारणी आपलेच म्हणणे खरे ठरवितात. अनेक उमेदवार या बाबतीत ‘हम करे सो कायदा” हीच नीती वापरतात. परंतु उमेदवाराच्या या मनमानीला जनता आता कंटाळलेली आहे. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” ही उक्ती सार्थ ठरविण्यासाठी “नया खेल, नया खिलाडी, नया राज” म्हणून शिर्डी लोकसभा मतदार संघाची मेकर- टेकर म्हणून उत्कर्षा रूपवते ह्या आपला उमेदवारी अर्ज लवकरच दाखल करणार आहेत. राजकारण म्हटलं की कुरघोड्या आल्याच.
आपले सर्वस्व पणाला लावत उमेदवार जनतेला विश्वासात घेऊन अनेक वर्ष सत्ता भोगतात. लालसेपोटी राजाश्रेयही मिळवतात. जनता भरडली गेली तरी त्यांना काही घेणे देणे नसते. परंतु ही अज्ञान जनता आता सज्ञान झालेली आहे. म्हणूनच शिर्डी लोकसभा मतदार संघांमध्ये एक होतकरू, अभ्यासू, सुशिक्षित, चिकित्सक काळजीवाहू व्यक्तिमत्त्व म्हणून उत्कर्षा रूपवतेकडे बघितल्या जाते. किंबहुना उत्कर्षा रूपवते ह्या शिर्डी मतदार संघात स्वतःचे राजपद प्रस्थापित केल्याशिवाय राहणार नाही हे नव्याने पहावयास मिळणार आहे. कारण माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे यांची भिस्त मतदार संघावर राहिलेली नाही. ज्या पद्धतीने पकड ठेवणे अपेक्षित होते तसे या दोघांकडूनही झाल्याचे दिसून येत नाही. मतदार संघामध्ये या दोन्ही उमेदवारा विषयी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. शिवाय तोच तोच चेहरा पाहून मतदारांना कंटाळा आलेला दिसून येत आहे. आता परिवर्तन हे अपेक्षित असल्याने नव्या उमेदीने या मतदार संघाचा उत्कर्ष होण्यासाठी टेकर, मेकर, आणि केअर म्हणून उत्कर्षा रूपवते ह्याच आघाडीवर राहतील. आम्ही वंचित घटकांना न्याय दिला म्हणणारे ते पुन्हा पुढे कधी आलेच नाही. तर दुसरीकडे विचाराची बांधिलकी जपण्यात राजकीय नेतृत्व हे कुठे तरी कमी पडत असल्याचेही आता उघडपणे बोलले जात आहे. असे असले तरी उत्कर्षा रूपवते हा एकमेव नवा चेहरा शिर्डी लोकसभा मतदार संघाला लाभणार आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडी कडून त्यांंना
टिकिट मिळाल्याने अनेक दिग्गजांबरोबरच मोठे पदाधिकारी, पक्षश्रेष्ठी, उमेदवार यांचेही चांगलेच ट्यूब लाईट लागले असून आपले काय होईल ? ही बैचैनी स्षष्टपणे त्यांच्यातच वाढलेली दिसून येत आहे. उत्कर्षा रूपवते बाबत बोलायचे झाले तर, प्री प्लानिंग ,
समयसूचकता ही स्पष्ट जाणवते. बोलायचेच झाले तर संगमनेर हे शरीर तर अकोले हार्ट असून इतर तालुके अती महत्वाचे अवयव आहेत. आणि म्हणूनच ही हिरकनी हा गड सर केल्याशिवाय राहणार नाही. यशवंत भवनाच्या
नेतृत्वात राजकीय गृहीतके बदलवण्याची क्षमता आहे हे तितकेच खरे. म्हणूनच शिर्डी लोकसभा मतदार संघाचे रूपच पालटण्याचे काम रूपवते करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या बोलण्यातून नेहमी जाणवते, त्या म्हणतात आमची भाषा ही संघर्षाची आहे. संघर्ष कायमच पूजलेला आहे. ऊर्जावान गोष्टी आपल्या जवळ असाव्यात हीच सकारात्मकता उत्कर्षा रूपवतेला विजयाकडे घेऊन जाणारी आहे, ‘जो मैदान में उतरते है ,वही खिलाडी कहलाते’ असे त्या म्हणतात. मतदाराचे कल्याण करण्यासाठी माझ्या समोर ही एक नामी संधी आहे. त्यामुळे मला प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठी अडचणी दिसतच नाही. याउलट मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठीच येथील मतदार बंधू भगिनी माझ्यावर हमखास
विश्वास टाकतील असा विश्वास रूपवते त्यांनी व्यक्त केला आहे. एकूणच काय तर ‘नया खिलाडी, नया खेल- नया राज’ असे चित्र सर्वदूर पहावयास मिळत आहे. उत्कर्षा रूपवते ह्या राज्य महिला आयोगाच्या सदस्या होत्या. तर
यांच्या उमेदवारीने आघाडीत बिघाडी झाली असे त्यांना वाटत नाही. मात्र शिर्डीचे राजकीय गणित निश्चितच कोलमडणार असून गृहीतकांची वजाबाकी ही आपल्या मतपेटीची टक्केवारी ही वर्गवारीत होणार असल्याचे त्या आवर्जून सांगतात. येथील मतदार दिलदार राजा आता नव्याने नवा बद्दल स्वीकारून हव्या असलेल्या एका नव्या चेहऱ्यालाच पसंती देतील हेच निर्विवाद सत्य होय.
शिर्डी हा अहल्यानगरचा उत्तर भाग आहे. सर्वच तालुक्यातील जनाधार आणि मतदारांचे विविध मते लक्षात घेता उत्कर्षा रूपवते या दोन्ही उमेदवारांच्या तुलनेत अत्यंत उच्चशिक्षित असून दिल्लीत शिर्डी मतदार संघातील शेतकऱ्यांचे, कामगारांचे, वंचितांचे, तरुणांचे प्रश्नासह अनेक प्रश्न त्या मांडतील अशी चर्चा आहे. शिर्डी मतदार संघाचा विकास खुंटलेला आहे. दोन्ही उमेदवारांना यापूर्वी मतदार राजाने संधी देऊन निवडू दिल्या नंतर पुन्हा मतदार राजाकडे यांनी कायमचीच पाठ फिरवली. गेली 15 ते 20 वर्ष या मतदार संघातील एकही प्रश्न लोकसभेत मांडलेला दिसत नाही. मतदार राजा आता अज्ञान राहिलेला नाही. तो चहूबाजूंनी विचार करून सज्ञान झालेला आहे. येथील भोळी भाबडी जनता या दोन्ही उमेदवारांवर नाखुश आहे. नाराज आहे. असे देखील लक्षात येते. आता फक्त अपेक्षा आहे ती उत्कर्षा रुपवतेंकडूनच! म्हणूनच सर्व जनाधार लक्षात घेता सर्वच समाज घटकांमध्ये उत्कर्षा रूपवतेंचाच आवाज सध्या दिसत आहे.
तसे पहावयास गेल्यास शिर्डी लोकसभेने या दोन्ही उमेदवारांचे चेहरे अनुभवले आहेत. यात नवीन असे काही नाही. परंतु विखे आणि थोरातासाठी ही अस्तित्वाची लढाई तर नाही ना ? या दोन्ही बलाढ्य उमेदवाराच्या फडात उतरलेल्या महिलेला जनताच सहानुभूती दाखवेल. कारण काँग्रेसला सोडून वंचित मधील प्रवेश हा एक नवीन वेश धारण करणारी एक महिला असणार आहे. खरे तर उत्कर्षा रूपवते यांना तिकीट मिळाल्याने त्या माजी खासदार वाकचौऱे यांच्या मतांवर परिणाम करतील, तर खासदार लोखंडेचा निसटता विजय होईल असेही बोलले जात असले तरी एकूणच मतदार संघातील परिस्थिती, जनाधार, लोकसंख्या आणि मतदात्यांचा कौल आणि नाराजीने विजयाची कांडी ही उत्कर्षा रूपवतेकडेच असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी मतदार संघात मतदात्यांची लक्षणीय वाढ झालेली आहे. झालेली ही वाढ युवा वर्गांची असून युवा वर्गांलाही एका महिलेचा आणि तो ही नवा चेहरा अपेक्षित आहे. मतदार संघात तिन्ही उमेदवार तगडे असून आपली वेगळी ताकद आणि छाप असलेले बबनराव घोलप हे चौथा चेहरा म्हणून उमेदवारी दाखल करणार का ? असाही एक सूर नव्यानेच उमटत आहे. यदा कदाचित असे झाल्यास शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीची रंगत ही अतिरंजित होऊन चौरंगी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!