वंचितचा हुकमी एक्का प्रस्थापितांना धक्का

 उत्कर्षताई रुपवते यांच्या वंचित प्रस्थापितांनी घेतला धसका 

उत्कर्षाचा विजय म्हणजे जागृत बहुजन समाजाच्या जागृत राजकारणाचा विजय होय.

शिर्डी / लोकवेध live न्यूज / दीपक गायकवाड 

 

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उत्कर्षा रूपवते यांना तिकीट देऊन वंचितने प्रस्थापितांच्या घराण्याला व त्यांच्या आजपर्यंतच्या राजकारणाला सुरूंग लावला आहे. यामुळे वंचित बहुजन समाजाला आता आपल्या ताकदीची जाणीव होऊन ते स्वाभिमानाने रणांगणात उतरून आपला न्याय जिंकून आणतील, अशी आजची सर्व राजकीय परिस्थिती आहे. या अगोदर हा मान  डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संगमनेरच्या पी. जी रोहम यांनी मिळवला होता. ते साल १९३८चे होते. आता १९३८ च्या नतंर आज ७२ वर्षांनी हा योग जुळून आलेला आहे. त्यावेळच्या अडाणी,अज्ञानी व निरक्षर लोकांनी,म्हणजे आपल्या वाडवडिलांनी प्रस्थापितांना पराजयाचे अस्मान दाखवले होते. आजतर त्यांचीच संतान सुसक्षित व सज्ञान आहेत. ते तर हा विजय एकहाती खेचून आणतील. इतकी त्यांची बौद्धिक व शारीरिक शक्ती आहे. आणि विशेष म्हणजे तो १९३८ चा विजय जसा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा होता तसाच तो आज वंचितचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर म्हणजे डॉ आंबेडकरांच्याच नातवाचा आहे. हे आज आपल्या समाजाने प्रथमतः लक्षात ठेवले पाहिजे. कारण पी. जे. रोहम नतंर आपला समाज गेल्या सत्तर वर्षात म्हणजे जवळजवळ सात दशकात आपण प्रस्थापितांचे राजकीय गुलाम म्हणूनच जीवन जगत होतो. यामुळे आपल्या समाजात ब-याच राजकीय कार्यकर्त्यांना राजकीय गुलामीचे डोहाळे लागण्याची सवयच जडली. पण आज या निमित्ताने ती मोडली जाईल असे वाटते. ज्याची ती मोडणार नाही तो कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीच्या वंशाचा नाही, असे स्पष्ट दिसून येईल असे वाटते. यामुळे आज सर्वच बहुजन समाज उत्कर्षा रूपवतेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल व आपली राजकीय गुलामी नामशेष करेल असे सारे चित्र आहे. वंचितच्या उमेदवारीचा धसका वंचितचा उमेदवार उभा रहाण्या आधीच प्रस्थापित राजकारण्यांनी घेतला होता. आता तर खर्च किती करावा व करावा की नाही अशी त्यांची अवस्था झालेली आहे. कारण ज्यांनी झेंडे, बॅनर, पत्रके यांची ऑर्डर ज्यांना दिली होती, त्यांनाच फोन करून ती कमी करण्यास विनंती करायला सुरुवात केलेली आहे. समोरच वंचितचा तगडा उमेदवार पाहून प्रस्थापितांचे उमेदवारच घाबरलेत अशी सारी परिस्थिती आहे.
यामुळे आज सर्वच बहुजन समाजाने वंचितांच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना निवडून आणणे काळाची गरज ठरलेली आहे.
तसेच यावेळचे मतदान म्हणजे ते वंचित बहुजन पार्टीला जरी असले तरी, ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला आहे. तेंव्हा आज समाजाला बोलक्या मतदारांची नाही तर ती कर्त्या मतदारांची गरज झालेली आहे.
आजपर्यंत कोण कोणत्या पक्षात व कोण कोणत्या गटात आहे हे महत्त्वाचे नसून, तो आंबेडकरी चळवळीच्या सोबत आहे का? व त्याला आंबेडकरी चळवळीच्या विषयी खरच पोटातून अस्था व अस्मिता आहे का? हे महत्त्वाचे आहे.
चळवळीवर बोलणारे बोलके सुधारक व चळवळीचा इतिहास सांगणारे अधारक , यांच्यापेक्षा किती चळवळीचे कर्ते सुधारक आहेत व यांच्यावरच हा विजय अवलंबून आहे.
पण सर्वांनीच फक्त बोलघेवड्यापणा व दिखाऊपणा सोडून फक्त आंबेडकरी चळवळीला मतदान म्हणून मतदान केले व करवून घेतले तर, मला वाटते उत्कर्षाचा विजय हा निश्चित आहे.
उत्कर्षा रूपवतेंचा विजय म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा विजय, उत्कर्षाताईचा विजय म्हणजे आंबेडकरी चळवळीचा विजय, उत्कर्षाचा विजय म्हणजे जागृत बहुजन समाजाच्या जागृत राजकारणाचा विजय होय.
तेंव्हा प्रत्येक कार्यकर्त्याने कर्त्या सुधारकाची भूमिका घेऊन, वंचितांच्या उत्कर्षा विजय म्हणजे माझी व माझ्या बहुजन समाजाच्या अस्तित्वाचा विजय, असे समजून कामाला लागावे. तसेच गुलाबाला गुलामीची जाणिव करून देऊन त्याला स्वाभिमानाने लढण्यास उभे करावे. हे येवढेच आज हात जोडून सर्वांना सांगणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!