आईच्या आईपणातच आईचे श्रेष्ठत्व दडलेले असते.

सर्वांची आई – कै. विमल विठोबा वर्पे

आई मध्ये दोन शब्द आहेत. आ + ई. जिच्या ठायी ईश्वराचा आत्मा असतो तिला आई म्हणतात. आईच्या आईपणातच आईचे श्रेष्ठत्व दडलेले असते. संगमनेर तालुक्यातील कोळवाडे गावातील रहिवासी आपल्या सर्वांची आई कै. विमल विठोबा वर्पे यांचे वयाच्या ७० व्या वर्षी वृद्धापकाळ व आजाराने दुःखद निधन झाले. कोळवाडे येथील जयहिंद आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. दशरथ विठोबा वर्पे व प्रतिष्ठित शेतकरी श्री. बाबाजी वर्पे यांच्या त्या मातोश्री आहेत . विठोबा वर्पे हे सरांचे वडील आहेत. पत्नीच्या दुःखद निधनाने विठोबा वर्पे यांना जीवनसाथी गेल्याने दुःखद धक्का बसला आहे.
दशरथ विठोबा वर्पे, बाबाजी वर्पे सून सौ मंगल दशरथ वर्पे, सौ. पुष्पा बाबाजी वर्पे, तशेच सरांच्या बहिणी सौ. रतन किसन येवले, सौ सुनीता हौशीराम पाबळ, सौ. अनिता संपत मालुंजकर या सर्वांनी आजारपणाच्या काळात आईची केलेली सेवा अवर्णनीय अशी आहे. विठोबा नामदेव वर्पे व दादाभाऊ नामदेव वर्पे हे दोघेभाऊ आहेत. दादाभाऊ शेती करतात, ह.भ.प. या नावाने ओळखले जातात. विठोबा वर्पे हे पण व्यवसायाने शेतकरीच आहेत. गरिबी, दारिद्र, संघर्ष करून वर्पे परिवाराची प्रगतिकडे वाटचाल ही एक यशोगाथा आहे.

श्री. दशरथ वर्पे सर हे एक उच्च शिक्षित असून एम. कॉम.,बी. ऍड, एम. एस. डब्लू. आहेत. बाबाजी वर्पे हे एस.एस.सी. असून उत्कृष्ट शेती व्यवसाय करतात. सौ. मंगल दशरथ वर्पे हया एस. एस.सी. असून पुष्पा बाबाजी वर्पे हया एस. एस.सी. असून शेती व्यवसायात मदत करतात. दशरथ वर्पे सर यांचे चिरंजीव अक्षय हा एम. ई. (सिविल) असून त्यांची पत्नी सौ. भारती हया बी. एस्सी असून सूक्ष्मजीवशास्त्राच्या पदवीधर आहेत. सरांची थोरली कन्या जयश्री राहणे हया पदवीधर असून त्यांचे पती श्री. राहणे हे बांधकाम अभियंता आहेत. ते आफ्रिकेमध्ये आहेत. आरती वर्पे हया कृषी पदवीधर असून त्या एम.पी. एस. सि. चा अभ्यास करीत आहेत. सारांचे बंधू बाबाजी वर्पे यांच्या कन्या विद्या वर्पे हया बी. ए. एम. एस. असून, प्रज्ञा वर्पे हया बी. टेक. आहेत. ओंकार वर्पे हे १२ वी. विज्ञान करून उच्चशिक्षणसाठी प्रयत्न करीत आहे. हा सर्व वर्पे परिवाराच्या प्रगतीचा आलेख पाहिला असता शैक्षणिक दृष्टीस प्रगत आहे. यात सर्वात मोठे योगदान कै. सौ. विमल विठोबा वर्पे यांचे योगदान आहे. अशोक वर्पे, नवनाथ वर्पे, सौ. वनिता गुंजाळ यांची ही साथ आहे. एक आदर्श वर्पे कुटुंब व त्या कुटुंबाचे आदरवड कै. सौ. विमल विठोबा वर्पे यांचा नामोल्लेख करावाच लागेल. वर्पे सर यांचा मोठा मित्र परिवार सर्वच क्षेत्रात आहेत. ह. भ. प. दादाभाऊ वर्पे यांची कन्या सौ. वनिता गुंजाळ हया खांडगाव ला असतात. वर्पे परिवार म्हणजे कोळवाडे गावातील एक आदर्श कुटुंब म्हणून ओळखले जाते. बंधू प्रेम, एकमेकांना आधार, सर्वांशी प्रेमाने वागणे, एकमेकांना मदतीचा हात, अध्यात्मिक कार्यात क्रियाशील भाग घेणे हे या वर्पे परिवाराचा सद्गुण सर्वाना प्रेरणा देऊन जातो.

जन्म माणसाच्या हातात नाही, तसाच मृत्यू ही माणसाच्या हातात नाही परंतू जन्म मृत्यूमधील जगणं मात्र सार्थकी व कृथार्थ करणे हे माणसाच्या हातात आहे. माणूस किती वर्ष जगला त्यापेक्षा तो कसा जगला हे महत्वाचे आहे. स्व. सौ. विमलताई वर्पे यांचा संपूर्ण जीवन संघर्षमय होते. अडचणींना संकटे समजू नका त्यांना लाथाडू नाका ही संकटे तर आपल्याला जगण्याचे आणि पुढे नेण्याचे पण बळ देत असतात. वादळाची सवय करावीच लागते. रोजच येईल दुःख नवी नवी जे पेरतात स्वतःची जिवंत आयुष्य , दुःखाच्या डोंगरावर त्यांची मैफिल निर्वाण मांडते, ज्वाला नाचतात वादळातही.मनुष्याने पाण्यासारखे जीवन जगावे. पाण्याला कशातही मिसळा तोच रंग ते प्राप्त करते. जीवन जगण्यासाठी वाहत राहिले पाहिजे, जीवनात करण्यासारखे खूप काही आहे निराश होवू नका. यशाने हुरळून जाऊ नका. चंद्राला स्पर्श करतानाही ज्यांचे पाय जमिनीवर असतात तीच माणसे खऱ्या अर्थाने यशस्वी होतात. विमलताई वर्पे यांनी संकटात, दुःखात, आजारपणात सतत गरज वंतांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला तोच संस्कार
घेऊन त्यांची मुले दशरथ वर्पे सर, बाबाजी वर्पे त्यांच्या संस्काराच्या शिदोरीतून आपले भावविश्व फुलवून समाजापुढे एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत यांचा अभिमान वाटतो.

मानवाच्या हृदयामध्ये समाधान हरवत चालले आहे. श्रीमंत माणसे सद्गुणांच्या अभावी कंगाल वाटत आहेत. श्रीमंती बरोबरच निर्दयता वाढत चाललली आहे. दया, क्षमा, शांती माणुसकी हरवून कंगाल झालेला माणूस हा माणूसच राहत नाही. या जगात माणूस हा मनाने श्रीमंत हवा – संघर्ष व कष्ट करून पुढे आलेली कुटुंबे ही समाजाला आदर्श करतात. कोळवाडे येथील दशरथ वर्पे परिवार हे एक आदर्श कुटुंब असून संकटावर मात करून आई वडिलांचे आदर्श घेऊन उच्च ध्येयाप्रत जाण्याचा प्रयत्न केला आहे. जयहिंद आदिवासी आश्रम शाळेच्या स्थापनेपासून कोळवाडे गावात त्यांनी प्राचार्य तसेच गावात माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या माध्यमातून विकासाच्या कामातून गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे. महाराष्ट्रात संस्थांची अनुदानित आश्रमशाळा म्हणून कोळवाडे गावच्या जयहिंद आदिवासी आश्रम शाळेचा उल्लेख केला जातो. दंडकारण्य अभियान, वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन गावाच्या नैसर्गिक सौदर्यात भर घालीत आहे. उत्तम शेती, चांगला संस्कार, उच्च ध्येय, हरित गावं, पाणलोट क्षेत्र कार्यक्रम या उपक्रमातून गावाचा वैभवात भर पडली आहे याचे सर्व श्रेय प्राचार्य दशरथ वर्पे सर, गावकरी, महिला बचत गट, युवक कार्यकर्ते यांना दिले जाते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

ज्यांनी स्वप्ने ध्येय, सुंदर असतात ती माणसे जगाची मार्गदर्शन बनतात. ज्यांची स्वप्ने कुरूप असतात, ती माणसे समाजात अडथळा निर्माण करतात ज्याची ध्येय महान असतात, उदात्त असतात ती माणसे ओबड धोबड पाषाणातून मूर्ती घडवितात. ज्यांची ध्येय अथांग असतात ती माणसे उंच आकाशाला गवसणी घालतात. नियतीसमोर गुडघे टेकले तर नियती नेस्तनाबुत करते. मात्र उदान्त ध्येयासाठी नियतीशी झुंजले तर नियती सुद्धा नतमस्तक होते. स्व. विमल ताई वर्पे यांचा संपूर्ण जीवन प्रवास संघर्षावर मात करत यशस्वीतेकडे होणारी वाटचाल आदर्शवत आहे. कोळवाडे येथील वर्पे परिवारास प्रेमाने, प्रितीने, ममतेने, संस्काराने, अद्यात्मिकतेने समृद्धीकडे वाटचाल करण्यास प्रेरणा दिली आहे. म्हणून म्हटले आहे की उदात्त ध्येय बाळगणाऱ्या माणसाबरोबर नियती नतमस्तक होते म्हणून म्हटले आहे की, आकाशात झेप घाईची असेल तर
त्यांची उंची कधी मोजू नये
सागरात झेप घ्यायची असेल त्यांची
खोली कधी मोजू नये
शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या माणसानी ध्येय साध्य करताना वादळवाऱ्याची पर्वा कधी करू नये.

कोळवाडे येथील दशरथ विठोबा वर्पे यांनी माणसे जोडली आहेत. विमल आईच्या अंत्यसंस्कारसाठी मोठ्या प्रमाणात संगमनेर, नाशिक, अहमदनगर, इगतपुरी, या भागातून जनसमुदाय उपस्थित होता. त्यात महाराज राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदार संघांचे माजी आ. डॉ. सुधीर तांबे साहेब, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशन च्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, संगमनेर सह. सा. का. चेअरमन बाबा ओहोळ, कार्यकारी संचालक – जे बी. घुगरकर साहेब, भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन – सुधाकर जोशी, इंजिनिअरिंग कॉलेजचे सी. ई. ओ. अनिल शिंदे साहेब, इगतपुरी पंचायत समितीचे उपसभापती सौ. कांचनताई थोरात तसेच शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून दशरथ वर्पे सर परिवाराचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.
” कळीसारखे उमलून, फुलासारखे फुलत जावे
क्षणाक्षणाच्या ताटावर, आयुष्य झुलत जावे
अश्रू असो कोणाचेही, आपण विरघळून जावे
नको कोणीही आपले, आपण मात्र कोणाचेही व्हावे.

वेळ आणि काळ कुणासाठीही थांबत नसतो. विमल विठोबा वर्पे हया शरीराने आपल्यातून गेल्या आहेत परंतु विचाराने त्या आजही आपल्यातच जिवंत आहेत. त्यांनी घालून दिलेला संस्काराचा, शिकवाणूचा, विचारांचा जागर केला पाहिजे. आईच्या आईपणातच आईची श्रेष्ठत्व असते. जिच्या ठायी ईश्वराचा आत्मा असतो त्यास आई म्हणतात. ” स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ” विमल वर्पे आई आपल्यातून गेल्या आहेत परंतु आता परत येणार नाहीत त्यांची आठवण आली तर दुःख वाटते.
बोलवितेस देवा तव प्रिय सेविकेला
सरले जगाचे नाते, नवजीवन दे त्यांना !
दशरथ वर्पे सर व परिवार, नातेवाईकांना दुःख सहन कारण्याची परमेश्वर शक्ती देवो ही प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!