एक आदर्श माता हरपली कै. लहानबाई मुरलीधर बोरकर
ज्या व्यक्तीमुळं हे जग पाहता आलं त्या व्यक्तीविषयी आपल्या भावना नेमक्या शब्दात पकडणं.. त्यांची अभिव्यक्ती करणं महाकठीण असतं. आयुष्यात आपण कितीही मोठं झालो तरी… थरथरत्या पावलांना आत्मविश्वास आणि चालण्याचं बळ देणारी आई विसरु म्हटलं तरी विसरता येत नाही हेच खरं… प्रत्येकाचं अवघं विश्व या दोन अक्षरी शब्दानं भरलेलं असतं
  जिच्या हाती पाळण्याची दोरी! तिच जीवनाचा उध्दार करी!..अशी आदर्श माता  लहान बाई मुरलीधर बोरकर  यांचा जन्म सन  1934  रोजी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथे शेतकरी कैलासवासी पर्वत सखाराम शिंदे  आणि आई शिंदे यांच्या पोटी झाला. लहान बाई  ही त्यांची आवडती लेक  होय. लहान बाई  हिस  आई -वडिलांकडून आदर्श संस्काराचे बाळकडू मिळाले.आई -वडिलांची घरची परिस्थिती बेताची!..परिस्थितीमुळे लहान बाईला  शिक्षण घेता आले नाही.शेतीचे  आणि घरातील कामे करण्यात सर्वांत पूढे..परिवारात लाडात वाढलेली लहान बाई  स्वभावाने धार्मिक, शांत,संयमी,विनम्र,मनमिळावू अशा गुणांनमुळे शिंदे परिवारात लहान बाईने परिसरात मानाचे स्थान मिळविले. त्यामुळे आपल्या  कमी कालावधीत त्यांचे सर्व नातेवाईकांमध्ये एकरुप झाल्या. जोर्वे  ता.संगमनेर येथिल मुरलीधर मानाजी बोरकर यांचेशी विवाह झाला मुरलीधर बोरकर  यांची घरची परिस्थिती जेम-तेम,पोटापुरती शेती त्यामुळे दुस-याची शेतीचे कामे करुन आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह करित असे.कै. मुरलीधर बोरकर आणि लहान बाई हे अतिशय प्रामाणिक कष्टाळू वृत्तीचे  वर्षानुवर्ष शेतीचे कामे केली. कुटुंब मोठे असल्याने
घरी मोठा राबता होता.  लहान बाईला  खुप काम पडायचे तिची  इच्छा होती मुलांनी खूप शिकावे, तीला लहानपणी शिकता आले नाही याची खंत तिच्या मनामध्ये होती. आपण अडाणी राहिलो परंतु आपली मुलं अडाणी राहिली नाही पाहिजे मुलांनीही उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि ताट मानेने जगले पाहिजे अशी भावना त्यांच्या मनात होती त्यांच्या मुलांनी त्यांची अपेक्षा पूर्ण केली
त्यांना बाळासाहेब सोपान वसंतराव भाऊसाहेब  अशी चार मुले आणि वच्छला बेबीताई छबुबाई मीना या चार  मुली होत.स्वत:ची शेती आणि  शेतात मजुरिची कामे करुन त्यातून मिळ्णा-या पैशावर चार ही मुलींचे विवाह केले.त्या चारही  मुलींचे अगदी सुखी संसार सुखाने  चालू आहे.शेतीचे कामात थोरला मुलगा बाळासाहेब, वसंतराव  यांची खुप मोठी मोलाची साथ लाभली.
 स्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या परिवाराशी अतिशय निकटचा परिवार म्हणून जोर्वे गावात या परिवाराची ओळख आहे लहान बाई यांचा थोरला मुलगा बाळासाहेब यांनी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात दादांच्या गाडीवर पंचवीस वर्षे सेवा केली  त्यामुळे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या परिवाराशी अतिशय जवळचा परिवार म्हणून बोरकर परिवाराचे नाव प्रामुख्याने घेतले  जाते तर दोन नंबरचे सोपान हे मुंबईला बँकेत  नोकरी निमित्त होते ते आता सेवानिवृत्त आहेत
 तीन नंबरचा मुलगा वसंतराव यांनी जोर्वे गावचे  सरपंच पद ही भूषवले असून ते गावच्या सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठं आहे  मोठ्या भावांनी भाऊसाहेबांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना वकील केले . बाळासाहेब व  वसंतराव  यांना शिक्षणाची आवड परंतु परिस्थितीमुळे कमी शिक्षण झाले  त्यांनी आई -वडील यांना शेती कामास मदत करित असे. वसंतराव  यांचेवर कुटुंबाची सर्व जबाबदारी पडली एवढी मोठी जबाबदारी पेलावनं खुप मोठे काम होते तरी देखील ही सर्व यशस्वीपणे पार पाडले.आपले कुटंबासाठी मिळेल ते कामे करुन भावांचे  शिक्षण सुरु ठेवले आणि आपल्या कुटुंबाला काही प्रमाणात आधार दिला. त्यासाठी लोक काय म्हणतील याचा विचार केला नाही,कामाची लाज कधी बाळगली नाही, आई-वडिलांची शेवटपर्यंत त्यांनी सेवा केली लहान बाई यांच्या सुना विमल मंदाताई  सीमा सुभद्रा यांनी या मातेची आई प्रमाणे सेवा केली नातू बाबासाहेब संजय रोहित माधुरी राहुल प्रियंका हर्षद रोहन हे उच्चशिक्षित असून यांनी आपल्या आजीचे विचार आचरणात आणून उच्च शिक्षण घेतले आणि सर्व नातवंडे नोकरीला कामानिमित्त बाहेरगावी आहेत  रस्त्याने चालतांना पैश्याने श्रीमंत असलेली मानसं पावलो पावली भेटतिल परंतु मनाची श्रीमंती असलेली मानसं भेटणार नाही तेच या परिवाराने केले.आज पैसा पैसाही कमावला व  मोठ्या मनाची श्रीमंती असलेली मानसं कमविलि अनेक परिवार ,माणसे आजपर्यंत जोडली.  आईच्या धार्मिकतेचा संस्कार घडला
 बोरकर परिवाराचे गावच्या
 विकासात मोलाचे योगदान आहे.त्यामुळेच जोर्वे गाव आणी पंचक्रोशीत धार्मिक कार्यात त्यांचा मोठा बोल-बाला आहे. हा एक असा परिवार की,गावात सर्वसमावेशक आणी समाजकारण,शिक्षण,धार्मिक क्षेत्रात सदैव अग्रेसर!..
 मुलांवरती चांगले संस्कार केल्यामुळे संस्कारीत मुले जन्माला घातली याचा  मनस्वी आनंद यांना झाला.स्वर्गीय लहान बाई ह्याच इतक्या संस्कारीत होत्या की,खरोखर इतर महिलांनी नवीन विवाहित मुलींनी त्यांचा आदर्श घेणे ही काळाची गरज आहे.महिला संस्कृती जपण्याचे आदर्श काम लहान बाईंनी केले त्यांचे एक नेहमी वैशीष्ठे असायचे की,कपाळी आपल्या भारतिय संस्कृतीत सुंदर महिलांचा पतीचा अलंकार म्हणून पतीच्या नावाने लावले जाणारे कुंकू कंपाळी न चुकता लावत असे. अशा आदर्श मातेचा इतरही महिलांनी ,नवीन विवाहित मुलींनी खरा या मातेचे अनुकरण करणे आवश्यक आहे.लहान मोठ्यांशी आदराने ,सन्मानपूर्वक वागत असे  त्यामुळे या मातेबद्दल प्रत्येकाच्या मनात आदराची भावना असे.  आज आपली संस्कृती लोप पावत चालली आहे या मातेचा आदर्श घेण्यासारखा आहे .मुलांचा खरा मायेचा आधार गेला.कुटुंबाचा एक मुख्य बुरुंज ढासळला त्यामुळे कुटुंबाचा एक चालता बोलता मार्गदर्शक गेल्याची भावना झाली.मुलांची खरी भर-भराट बघण्यासाठी आज ते हवे होते अशी भावना मनात होती. शुक्रवारी 12/ 4/ 2024 रोजी .वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लहान बाई  यांचे जीवनप्रवासाचा अखेरचा दिवस ठरला.मुले-मुली यांना आपली आई या जगातुन कायमची सोडून  गेल्याने या पूढे आई या नावाचं वादळ अखेर शांत झालं.’स्वामी तिन्ही जगाचा ,आई विना भिकारी!..’आज ही सर्व मुले आई विना पोरकी झाली .आपल्या जीवनात आईने अनेक आमचे काही गुन्हे, दु:ख प्रसंग स्वत:मनात ठेवले.जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल.परंतु जीवनात एकदा गेलेली आई ही कोणत्याही बाजारत विकत घेता येत नाही.म्हणूनच म्हणतांत ‘बाप हा मंदिराचा पाया तर आई हा त्या मंदिरावरील कळस होय! ज्यांच्या* *जिवनातुन हे दोनही व्यक्ती जातात ना तेंव्हा त्यांना विचारा की,आई -बापाचे महत्व काय असते?जगी माऊली सारखे  कोण आहे,जिच्या जन्मांतरीचे ऋण की,ज्यास व्याज नाही त्या ऋणाविना जीवनास साज नाही!..
 आई खरच काय असते-आई असतो एक धगधगता धागा! वातीला उजेड दावणारी समइतील जागा! तर घर उजळ्तं घर तेंव्हा तिचा नसतो भाव-विझून गेली अंधारात की,सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान! पिके येतात नि जातात! माति मात्र व्याकुळ,तीची कधीही भागत नाही तहान!..दिसत नसेल डोळ्यांनी तर खोदत गेलो खोल-खोल की ,सापडते अंतकरणातील खाण!..याहून निराळी असते आई  ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यांत हंबरणा-या गायी!.. आई खरच काय असते?
 लेकरांची माय,वासराची गाय,दुधाची सांय असते! लंगडयाचा पाय असते,धरणीची ठाय असते.आई असते एक जन्माची शिदोरी सरतही नाही !उरतही नाही.अशा या आदर्शवत मातेचा स्वर्गीय लहान बाई मुरलीधर बोरकर  यांचा दशक्रिया विधी रविवार दि.21/04/2024 रोजी दत्त मंदिर जोर्वे प्रवारातीरी  होत आहे.स्वर्गीय लहान बाई  यांचे प्रति श्रद्धांजली पर माझ्या भावना शब्दांकित करत असतांना मी एवढेच म्हणेल की,
 आई एवढे कशालाच मोल नाही!
 प्रेम केले तुम्हीं आम्हां सर्वांवर जिवापाड!पण क्षणात झाला नजरेआड,नाही समजली नियतीची खेळी,निरोप घेतला अमुचा अवेळी! वात्सल्य सिंधू-आई -प्रेम स्वरुप आई ..बोलावू आज तुजला मी कोणत्या ठायी!
  आदर्श मातेस भावपुर्ण श्रद्धांजली!
 माजी सरपंच वसंतराव बोरकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!