ये हवा अब रुख नही सकती ; और रुक भी नही बदलेगी आयेगी तो आयेगी वंचित विकास आघाडी आयेगी – उत्कर्षा रूपवते
उन्नती पासून वंचित राहिलेला वर्ग राहात्यात एकवटणार; विधवा, सुशिक्षित बेरोजगार युवक युवती शेतकरी आदिंचा जनसागराचा राहणार सहभाग
संगमनेर /लोकवेध live न्यूज [भारत रेघाटे]
गेली अनेक वर्ष या मतदार संघाचा म्हणावा तसा विकास झालाच नाही. आजी माजी उमेदवारांनी मतदारांना विश्वासात घेत खूप काही देण्याची भाषा करत केवळ गाजर दाखवले. परंतु आता या मतदार संघातील जनता नीट विचार करून कोणाच्या दबावाला बळी न पडता, धीट मनाने पुढे होऊन वंचित आघाडीची शीट आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे मत उत्कर्षा रुपवते यांनी व्यक्त केले. एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील अनेक मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने आपली वज्रमूठ चांगलीच आवळली असून केंद्रात आपलीच सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आणि वंचितांचा आवाज केंद्रात पोहोचल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेबांनी माझ्यावर टाकलेला
विश्वास मी सार्थ करून दाखवेल असेही त्या म्हणाल्या. अनेक वर्षा पासून या मतदार संघात समस्या आहेत. त्याचे निराकरण करून वंचित राहिलेल्या वर्गाला आपण न्याय देणार आहोत. हा दबलेला आवाज आता एकवटला असून हा आवाज केंद्रात पोहोचण्यासाठी आपण उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहोत. आता एकच आशा, नवी दिशा. मतदात्याने घेतले मनावर, वंचितचे बटन दाबल्यावर प्रतिस्पर्धीही येतील भाणावर असे उत्कर्षा रूपवते यांनी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. यावेळी मतदार संघातील हजारोंच्या संख्येने
जत्थेच्या जत्थे उपस्थित राहणार आहे. संगमनेर नासिक रोडवरील टॉप टेन येथून पदयात्रेला सुरूवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन केल्यानंतर हा जनसागर राहात्याच्या दिशेने पुढे रवाना होणार आहे.
अर्ज दाखल करण्यापूर्वी मतदार संघातील आम जनता, विधवा, तसेच महिला, सुशिक्षित बेरोजगार , युवक , युवती, शेतकरी आदीं समस्याग्रस्त घटकांना त्या एक संदेश देऊ इच्छितात. राहाता या ठिकाणी उद्या सकाळी उत्कर्षा रूपवते यांचे जल्लोषात स्वागत होऊन शक्ति प्रदर्शन होणार आहे. आपणास त्या ठिकाणी रॅलीचे भव्य, दिव्य असे स्वरूप पहावयास मिळणार आहे. रूपवते म्हणतात की, गेली अनेक वर्ष येथील जनतेचा विश्वास संपादन करून त्यांच्या सोबत विकासाच्या गप्पा करून केवळ गाजर दाखविण्याचे काम केले. अनेक वर्षापासून अनुसूचित जातीच्या उमेदवाराला प्रस्थापित व्यवस्थेने नाकारल्याने येथील घटक हा विकासापासून कोसो दूर राहिला आहे, वंचित राहिला आहे. आता तसे कदापि होऊ देणार नाही. म्हणूनच मतदार संघातील वंचित राहिलेल्या समूहाला विश्वासात घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी आपण हा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, “ये हवा अब रुक नही सकती ; और रुक भी नही बदलेगी ” आपल्या खास अशा शैलीत उत्कर्षा रूपवते यांनी सांगत. प्रतिस्पर्ध्याला
जणू काही एक वेगळाच संदेश त्यांनी दिला. त्या म्हणतात मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन मतदारांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आपण आलो असल्याचे त्यांनी सांगितले. ये मेरा आखरी डाव असे म्हणत लोकसभेची आपली लढाई ही विचारांची विकासाची व महत्वाची असून आखरी डाव जीत की और, इस बात से में करती हूं गौर असे त्या म्हणाल्या. महायुती आणि महाविकास आघाडीच्या या प्रस्थापित व्यवस्थेला शह देण्यासाठी एक सक्षम नि भरभक्कम पर्याय आपल्या समोर उभा आहे. तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा पर्याय. हा एक खास विकल्प आहे, म्हणूनच या मतदार संघाचा कायाकल्प करण्यासाठी तसेच जनतेची निवडणूकीचे प्रतिनिधित्व करून हा संकल्प सिध्दीस जाण्यासाठी व न्याय देण्यासाठी आपण मला विजयापर्यंत नक्कीच पोहोचवाल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
