धार्मिक उत्सव माणसाला एकत्र आणतात ;- उत्कर्षा रूपवते
संगमनेर/ लोकवेध live न्यूज
उत्सव माणसाला एकत्र आणतात. वर्धापन दिन हा वृद्धिंगत करणारा क्षण आहे, वाढ करणारा क्षण आहे. सामुदायिक, विविध धार्मिक कार्यक्रमात मधून मानवतेचे नाते दृढ होतात यातूनच आपले ऋणानुबंध दृढ होतात व ते असेच वाढत जातात. अशा कार्यक्रमातून आपलेपणा दिसून येतो. तालुक्याच्या पठार भागातील वनकुटे गावातील श्री खंडोबा रायाचे दर्शन घेत नागरिकांशी रूपवते ह्या भावनिक होत त्यांनी येथील नागरिकांशी संवाद साधला. श्री क्षेत्र खंडोबारायाचा द्वितीय वर्धापन दिनानिमित्त त्या बोलत होत्या. उत्कर्षा रूपवते हे सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोठ्या जोमाने फिरत आहेत उत्कर्षा रूपवते यांचा ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांनी सर्व भक्तगणांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. येथील ग्रामस्थानी रूपवते यांना या भागाच्या खासदार होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिर्डी मतदार संघात उत्कर्षा रूपवते यांचे झंझावाती दौरे सुरू असून त्या मतदार संघात भिंगरी सारख्या फिरत आहे.
