पाटील नगर श्री स्वामी समर्थ केंद्रात दि ३० एप्रिल ते ६ मे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन…

नाशिक / लोकवेध live न्यूज / निलेश शेकोकार 

श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास दिंडोरी प्रणित सेवामार्गाचे प्रमुख प. पू .गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशिर्वादाने श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र पाटील नगर येथे दि ३० एप्रिल ते ६ मे २०२४ श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सात दिवसांच्या सप्ताह कालावधीत सकाळी आठ वाजेच्या भूपाळी आरतीनंतर सामुदायिक श्री गुरूचरित्र ग्रंथाचे पारायण होईल तसेच सकाळी ८ ते सांय. ८ वाजेपर्यंत महिला सेवेकरी या प्रहर सेवेत सहभागी होतील तर रात्री ८ ते सकाळी ८ यावेळेत पुरूष सेवेकरी प्रहर सेवा रुजू करतील ..
श्री नवनाथ ग्रंथ, श्री भागवत ग्रंथ, श्री दुर्गासप्तशती, श्री स्वामी चरित्र सारामृत आदि ग्रंथाचे पारायण होईल तसेच सोमवार, दि. २९ एप्रिल २०२४ ग्रामदेवता सन्मान, मंडल मांडणी, अग्निप्रदिपन*

मंगळवार, दि. ३० एप्रिल २०२४ मंडल स्थापना, स्थापित देवता हवन,नित्यस्वाहाकार

बुधवार, दि. १ मे २०२४
नित्यस्वाहाकार, गणेश याग/मनोबोध याग

गुरुवार,दि.२ मे २०२४ नित्य स्वाहाकार, चंडी याग

शनिवार, दि.४ मे २०२४ नित्य स्वाहाकार, स्वामी याग

शुक्रवार, दि. ३ मे २०२४
नित्य स्वाहाकार, गिताई याग

रविवार, दि.५ मे २०२४ नित्य स्वाहाकार, रुद्र याग, मल्हारी याग होऊन

सोमवार, दि.६ मे २०२४ नित्य स्वाहाकार, बलि पूर्णाहुती श्री सत्यदत्त पूजन, अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह सांगता होईल ..

तसेच या सप्ताह कालावधीमध्ये विवाह संस्कार विभागांतर्गत इच्छुक वधु – वरांची मोफत नावनोंदणी, श्री जनकल्याण योजना नावनोंदणी, तसेच श्री स्वामी समर्थ सेवा मासिक अंक नोंदणी यावेळी करण्यात येईल या सात दिवसांत सेवामार्गाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले तरी या सप्ताह कालावधीत सेवेकरी बंधु – भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!