मालुंजेत खंडोबा यात्रोत्सव मोठया भक्तीभावात व उत्साहात संपन्न
जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यतीने यात्रा उत्सवात रंगत
जिल्ह्यातील नामवंत मल्लांची हजेरी
पिंपरणे / लोकवेध live न्यूज

येळकोट येळकोट जय मल्हार , सदानंदाचा येळकोट” च्या जयघोषात आणि डीजे च्या तालावर मालुंजे येथील ग्रामदैवत हनुमान जयंती व खंडोबा देवाचा यात्रा उत्सव मोठया भक्तीभावात व उत्साहात पार पडला. सोमवारी
दुपारी २ वा जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यतीचा थरार ग्रामस्थांना पहावयास मिळाला एक हजार रुपयापासून ते आकारा हजार रुपये पर्यंत विजेत्या बैलगाडा जोड्यांना बक्षीस देण्यात आले यावेळी अंतिम टांगा शर्यत विरगाव विरुद्ध उंबरी बाळापुर अशी झाली अंतिम टांगा शर्यतीत विरगाव च्या टांग्याने 11000 रुपये प्रथम पारितोषिक पटकावले
चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त होणाऱ्या या यात्रा उत्सवात हजारो भाविकांनी ग्रामदैवत खंडोबाचे देवदर्शन घेतले तसेच विविध धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गडावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती या ठिकाणी देवाच्या दारी जागरण गोंधळ तळीभंडार नैवद्य कुलधर्म कुलाचार करण्याची प्रथा या दिवशी आहे त्यामुळे दिवसभर गडावर भाविक येत होते खंडोबाच्या जयघोषाने खंडोबा गड दुमदुमून गेला होता
मंगळवारी दि २३ रोजी पहाटे ५ वाजता गावातील भजनी मंडळाने हनुमान मंदीरात भजनाचा कार्यक्रम केला नंतर हनुमान देवाचे पुजन करून जयंती साजरी केली तसेच गडावर वसलेले जागृत ग्राम दैवत खंडोबा देवाला दुधाने व पवित्र गंगाजलाने अभिषेक घालुन महा आरती करण्यात आली यावेळी गावचे सरपंच संदीप घुगे यांच्या शुभहस्ते खंडोबाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला नंतर यात्रौत्सोैव सुरू झाला खंडोबा देवाचे मंदिर उंच डोंगरावर असून मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे गडावर दिवसभर भाविकांचा दर्शन आणि नवसपुर्ती कार्यक्रम सुरू होता .संपूर्ण यात्रा उत्सव माजी सरपंच संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले
सायंकाळी ४ वा मानाच्या काठयांचा नाचवण्याचा व मिरवणुकीचा कार्यक्रम झाला यावेळी भावीकांनी खोबर भंडाऱ्याची उधळन करीत वाजतगाजत काठ्यांची मिरवणूक काढली यळकोट यळकोट सदानंदाचा येळकोट जय मल्हार गजराने गाव दुमदुमून गेले होते मानाच्या काठयांचे दर्शन घेण्यासाठी महिला पुरूषांनी खुप गर्दी केली होती .सायंकाळी ६.३० वाजता खंडोबा देवाच्या काठ्यांची मिरवणूक काढून गडावर दर्शनासाठी नेण्यात आल्या. सालाबाद प्रमाणे पारंपारिक यात्रा उत्सव निमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली तसेच गाभाऱ्यापर्यंत फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती रात्री ७ ते ८ हनुमान प्रासादिक भजनी मंडळाच्या वतीने संगीत भजनाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ८ वा सुनील कुमार औरंगाबादकर सह चंदाराणी औरंगाबादकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला
बुधवार दिनांक २४ रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत कुस्तीचा भव्य आखाडा पार पडला.त्यात ५०० रुपये ते अकरा हजार रुपये ईनामाच्या कुस्त्या पार पडल्या यावेळी अकरा हजार रुपये मानाची कुस्ती मालुंजेचे पैलवान सुचित घुगे व शिर्डीचे पैलवान पवन शिंदे यांच्यात झाली ही कुस्ती संगमनेरचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या हस्ते लावण्यात आली यावेळी उप पोलीस निरीक्षक सातपुते साहेब उपस्थित होते
या अतितटीच्या लढतीत
पवन शिंदे यास चितपत करत सुचित घुगे यांनी मानाची कुस्ती जिंकली
यात्रा उत्सव सुरळीत आणि यशस्वी पाडण्यासाठी गावच्या नवनिर्वाचित सरपंच सुवर्णा घुगे,मा.सरपंच संदिप घुगे,मुंबई पोलीस संदिप चौधर,किसन बुरकूल अमोल घुगे,तंटामुक्ती अध्यक्ष विष्णु घुगे, काशिनाथ सोसे, आनंदराव खरात, सुखदेव खरात, वसंत खरात, शशिकांत नागरे स्वप्निल बुरकुल ,योगेश गाभणे, शंकर जोर्वेकर, भाऊसाहेब सोसे, ज्ञानदेव सोसे बच्चू डोंगरे बाळू काकड , अमोल बुरकुल, दगडु नागरे ज्ञानदेव सांगळे , दादा वाघ प्रवीण गाडेकर आदीनी यात्रा व्यवस्थित पार पडण्यासाठी परिश्रम घेतले
सर्व देणगिदार ग्रामस्थ, मुंबई ,पुणे, नाशिक येथील देणगिदार भाविकांचे सरपंच संदिप घुगे यांनी आभार मानले
