रथच करेल मनोरथ पूर्ण; महिलांच्या बलोपासनेने वाढविले माझे मनोबल – उत्कर्षा रूपवते
हनुमान जयंती निमित्त संगमनेरात निघाला भव्य दिव्य रथोत्सव
संगमनेर / लोकवेध live न्यूज { भारत रेघाटे }
हनुमंताने बलोपासनेतून
संकटाचे निवारण केले. समाजामध्ये कोणत्याही कारणाशिवाय विनाकारण काही घडत नाही. समाजकारण, अर्थकारण, राजकारण हे एकमेकावर अवलंबून असले तरी आपल्याला आलेल्या अनुभवातून त्याचे निवारण करण्याची क्षमता एका अदभूत शक्तीत असते आणि ही शक्तीच एक ऊर्जा आहे. ही ऊर्जाच उत्कर्षाचा परमबिंदू होय. असे वैश्विक विचार शिर्डी लोकसभेच्या व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी व्यक्त केले. हनुमान जयंती निमित्त रथाचे सारथ्य उत्कर्षा रूपवते यांनी केले त्यावेळी आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्या पुढे म्हणाल्या की, हा रथच या निवडणुकीचे मनोरथ पूर्ण करेल असा विश्वास उत्कर्षा रूपवते यांनी व्यक्त केला. संगमनेर येथील हनुमान जयंती उत्सवाची परंपरा ही गेली सव्वाशे वर्षाच्या पूर्वीची आहे. हा धार्मिक अनमोल ठेवा जतन संवर्धन करण्याचे काम येथील महिला भगिनी करीत आहेत. महिला भगिणीची ही आत्मिक ऊर्चाच माझे मनोबल वाढविणारी आहे.
धर्मकारण,समाजकारण, अर्थकारण हा समष्टीचा कार्यकारणभाव आहे. म्हणूनच बुद्धिजीवी व्यक्तींवर आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना आपल्या कर्तृत्वातून दातृत्वातून दाखवून
समाजासमोर एक सक्षम नेतृत्व निर्माण करून दाखविण्याची गरज होती आणि आजही ती नितांत असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. हनुमानाचा रथ ओढण्याचा दोर हा नया दौर आहे. या भागात क्षणाक्षणाला दौरे करत असतांना मतदार संघात जनमाणसाचे फुलले चेहरे, त्यांच्या मनावर पसरलेला आनंद माझ्यासाठी एक नया दौर निर्माण करेल अशी शाश्वती त्यांनी यावेळी देत सर्व भक्तगण मान्यगणांना तसेच तमाम महिलावर्ग व समाज बांधवांना मनोभावे त्यांनी शुभेच्छा दिल्या. येथील सर्वसामान्यांच्या
इच्छित कामना वंचितच
पूर्ण करेल असा
आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. रथाचे सारथ्य करत असताना पोलीस निरीक्षक भगवान मथुरेसह पोलीस पथक महिला पोलीस कर्मचारी आणि इतिहास निर्माण करणाऱ्या संगमनेरातील महिलांचा जथ्था यावेळी या रथाचे सारथ्य करीत होता.
