कनोलीत खंडोबा यात्रोत्सव मोठया भक्तीभावात व उत्साहात संपन्न
 फटाक्यांच्या आतिषबाजीने  यात्रा उत्सवात रंगत 
 पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
येळकोट येळकोट जय मल्हार , सदानंदाचा येळकोट” च्या जयघोषात आणि डीजे च्या तालावर कनोली येथील ग्रामदैवत खंडोबा देवाचा यात्रा उत्सव मोठया भक्तीभावात व उत्साहात पार पडला.
https://youtu.be/uyru9WkcQyI?si=cmrj6nIj1ZP8FiW4
चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त होणाऱ्या या यात्रा उत्सवात  हजारो भाविकांनी ग्रामदैवत  खंडोबाचे  देवदर्शन घेतले तसेच विविध धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गडावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती या ठिकाणी देवाच्या दारी जागरण गोंधळ तळीभंडार नैवद्य कुलधर्म कुलाचार करण्याची प्रथा या दिवशी आहे त्यामुळे दिवसभर गडावर भाविक येत होते खंडोबाच्या जयघोषाने खंडोबा गड दुमदुमून गेला होता
 गडावर वसलेले जागृत  ग्राम दैवत खंडोबा देवाला दुधाने व पवित्र गंगाजलाने अभिषेक घालुन महा आरती करण्यात आली यावेळी ग्रामस्थांच्या शुभहस्ते खंडोबाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला नंतर यात्रौत्सोैव सुरू झाला खंडोबा देवाचे मंदिर उंच डोंगरावर असून मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे गडावर  दिवसभर भाविकांचा दर्शन आणि नवसपुर्ती कार्यक्रम सुरू होता .
 यावेळी भक्तगण मिळून  खंडेरायाच्या दर्शनासाठी  आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद दिला हे हे भक्तगण गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी महाप्रसाद भाविकांसाठी देत असतात ती परंपरा आजही सुरू आहे
संपूर्ण यात्रा उत्सव यात्रा कमिटी कनोली  यांच्या नेतृत्वाखाली पार पडले
 सायंकाळी सहा वाजता  मानाच्या काठयांचा नाचवण्याचा व मिरवणुकीचा  कार्यक्रम झाला यावेळी भावीकांनी खोबर भंडाऱ्याची उधळन करीत डीजेच्या तालावर वाजतगाजत काठ्यांची मिरवणूक काढली यळकोट यळकोट सदानंदाचा  येळकोट जय मल्हार गजराने गाव दुमदुमून गेले होते मानाच्या काठयांचे दर्शन घेण्यासाठी महिला पुरूषांनी खुप गर्दी केली होती .सायंकाळी आठ वाजता  खंडोबा देवाच्या काठ्यांची मिरवणूक संपल्यानंतर गावातील हनुमान मंदिर या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली  सालाबाद प्रमाणे पारंपारिक यात्रा उत्सव  निमित्त  मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली तसेच गाभाऱ्यापर्यंत फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती रात्री रात्री नऊ वाजता लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा लावण्यांचा बहारदार कार्यक्रम   संपन्न झाला
यात्रा उत्सव सुरळीत आणि यशस्वी पाडण्यासाठी यात्रा कमिटी  गावचे  नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्य गावातील विविध विविध पदाधिकारी संस्था ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले
सर्व देणगिदार ग्रामस्थ,  देणगिदार भाविकांचे यात्रा कमिटी यांनी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!