संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्या निवडी ; अध्यक्ष सालपे, उपाध्यक्ष मतकर, सचिव पानसरे तर कोषाध्यक्षपदी अहिरे
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारणीची सर्वानुमते
निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी मंगेश सालपे, उपाध्यक्ष अमोल मतकर, सचिव शेखर पानसरे तर कोषाध्यक्षपदी संजय अहिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 2024 – 25 या वर्षा साठी ह्या निवडी करण्यात आल्या आहेत.
संघाने आजवर पत्रकारांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी शहरवासियासाठी विविध उपक्रम राबवत सामाजिक काम केले आहे. तीच पंरपरा कायम ठेवून सामाजिक काम पुढे नेण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही निवडीनंतर नूतन पदाधिकार्यांनी दिली. या संघटनेकडे
विविध नामांकित
वृत्तपत्रात कार्यरत असणार्या संगमनेरातील सक्रिय पत्रकारांचे सर्वात मोठे आणि एक विश्वासू
संघटन म्हणून संगमनेर
श्रमिक पत्रकार संघाकडे बघितल्या जाते. संघाने अनेक ख्यातनाम
अनुभवी व्याख्याते आदि बौद्धिक मेजवाणी देणारे तसेच सामाजिक प्रेरणादायी उपक्रम राबविले. यावेळी संघाचे मावळते अध्यक्ष नितीन ओझा यांनी विगत वर्ष भरातील कामाकाजाचा आढावा सांगितला.
मावळते उपाध्यक्ष सतीश आहेर, सचिव सुनील महाले ,कोषाध्यक्षा नीलिमा घाडगे यांनी पदाचा कार्यकाळ उलगडून आपले मनोगत व्यक्त केले. नूतन अध्यक्ष मंगेश सालपे म्हणाले पदाधिकारी व संघटनेच्या माध्यमातून पत्रकार त्यांचे कुटुंबासाठी व शहर तालुका परिसरात समाज हितेषी उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. यावेळी संघाचे ज्येष्ठ पत्रकार श्याम तिवारी, गोरक्षनाथ मदने, आनंद गायकवाड, सचिन जंत्रे, सोमनाथ काळे, अंकुश बुब, धिरज ठाकूर, काशिनाथ गोसावी, संदीप वाकचौरे, भारत रेघाटे, बाबासाहेब कडू, सुशांत पावसे, गोरख नेहे, संजय साबळे
आदी पत्रकार उपस्थित होते.
