एनएफपीई संघटनेच्या अध्यक्षपदी एम जी पाटोळे तर
असिस्टंट डिव्हिजनल सेक्रेटरी पदी आईनाथ सोनकांबळे यांची निवड
नांदेड / लोकवेध live न्यूज
ऑल इंडिया आरएमएस आणि एमएमएस एम्प्लॉईज युनियनची विभागीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी एम जी पाटोळे तर
असिस्टंट डिव्हिजनल सेक्रेटरी पदी आईनाथ सोनकांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
ऑल इंडिया आरएमएस एमएमएस एन एफ पी ई विभागीय एल डीव्हिजन भुसावळ संघटनेचे धुळे येथे 37 वे द्विवार्षिक विभागीय अधिवेशन आयोजीत करण्यात आले होते.
या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी नांदेड आर एम एसचे एस आर ओ श्री एम जी पाटोळे, उद्घाटक जनरल सेक्रेटरी
पी यू खडसे जी,सर्कल सेक्रेटरी अरविंद शिवतरे, ईतर मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वानुमते कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये विभागीय अध्यक्षपदी नांदेडचे कर्तव्यदक्ष एस आर ओ श्री एम जी पाटोळे,उपाध्यक्ष ए एच आर मोमीन धुळे,उपाध्यक्ष एस एस भागवत नाशिकरोड,विभागीय सचिव एस आर भोपले भुसावळ, सहाय्यक विभाग सचिव ए पी सानप औरंगाबाद,सहाय्यक विभाग सचिव ए डी शिंदे नाशिकरोड,,सहाय्यक विभाग सचिव एस बी केदार औरंगाबाद,सहाय्यक विभाग सचिव पी आर वानखेडे परभणी,सहाय्यक विभाग सचिव जी आर लोहार धुळे,सहाय्यक विभाग सचिव एस आर आहीरे मनमाड,सहाय्यक विभाग सचिव नरेश कुमार मीना भुसावळ,असिस्टंट डिव्हिजनल सेक्रेटरी आईनाथ सोनकांबळे नाशिकरोड,संघटक सचिव एस बी राऊते भुसावळ,रोखपाल डी के राजपूत भुसावळ,ऑडिटर एस डी वाकळे यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली असून अधिवेशनाचे अध्यक्ष श्री एम जी पाटोळे यांनी सुरुवाती पासून ते शेवटपर्यंत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले असून उद्भवणाऱ्या समस्येवर उपाय काय असू शकतो. याचे देखील समाधानकारक उत्तर पाटोळे यांनी दिले. व कार्यकारणीवर शिक्कामोर्तब केला.यामुळे नूतन कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
