राधाकिसन (अण्णा ) विठोबा खेमनर वय वर्ष 43 हे रविवारी पाटाच्या कडेने आपल्या घराकडे जात असताना त्यांचा तोल जाऊन पाटाच्या पाण्यात पडले हे कोणाचे हे लक्षात आले नाही सदर किती वाजता घडली हे मात्र समजू शकले नाही मात्र सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास पाटाच्या कडेने येणाऱ्या जाणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पाईपला अडकलेला मृत्यु देह बघितला व तात्काळ सरपंच व पोलीस पाटील यांना खबर दिली पोलीस पाटील विनोद साळवे व सरपंच भाऊसाहेब खेमनर यांनी ही खबर संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवली यावेळी पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पल्लवी वाघ पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय दिघे पोलीस कॉन्स्टेबल मीरा बिबवे पोलीस कॉन्स्टेबल ओंकार शेंगाळ हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व सदर मृत्यूदेह ताब्यात घेतला यावेळी पाण्यातून मृत्यूदेह काढण्यासाठी गावातील तरुणांनी मदत केली सदर मृत्यू देह शेव विच्छेदानासाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले
