अद्वैत गायकवाड यांचा शोध निबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित.
संगमनेर / लोकवेध live न्यूज
तालुक्यातील नान्नज दुमाला येथील रहिवासी आणि सध्या संगमनेर येथे वास्तव्यास असलेले पेटिट ज्युनिअर कॉलेजचे इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड यांचे चिरंजीव अद्वैत गायकवाड यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे यश संपादन केले आहे. अद्वैत यांच्या ” वायरलेस नेटवर्क सुरक्षा” या विषयातील “एनहानसमेंट ऑफ डी-ओथेनटीकेशन मिटिगेशन टेक्निक फॉर आयओटी एनवायरोमेंट” हा शोध निबंध ” इंटरनॅशनल जर्नल ऑफ कंप्यूटिंग आणि डिजिटल सिस्टम्स” या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
चिरंजीव अद्वैत सध्या पुण्यातील एम.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड येथे एम. टेक (नेटवर्क व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा) चे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या संशोधनासाठी त्यांना इंटरनॅशनल जर्नल ऑफ कंप्यूटिंग आणि डिजिटल सिस्टम्स या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये डॉ. बालाजी पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. विशेष म्हणजे, या जर्नलचे स्कोपस इंडेक्स्ड क्वॉर्टाईल 3 मध्ये नामांकन झाले आहे. अद्वैत गायकवाड यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या या यशामुळे भविष्यातील संशोधकांना प्रेरणा मिळेल. अद्वैतने आपल्या जिद्दीने आणि कठोर परिश्रमाने हे यश मिळवले आहे.
चिरंजीव अद्वैतच्या या यशाबद्दल त्याचे आई,वडील , आजोबा नामदेव तुपे , अतुल तुपे, आयुष गायकवाड या सह नातेवाईक, हितचिंतक , मित्रमंडळी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहे. अद्वैत गायकवाड यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर संगमनेर तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
