संगमनेर तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन दिवस विशेष मोहीम राबवली जाणार महिलांनी लाभ घ्यावा – अमोल खताळ पाटील

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्रातील २१ ते ६५ वर्ष असलेल्या महिला भगिनींसाठी दरमहा पंधराशे रुपये देऊन त्यांचा सन्मान करण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब तसेच पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी घेतला आहे. या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी ही मोहीम घेतली जाणार आहे. महायुती सरकारची बदनामी करण्यासाठी काही महिलांना या योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न संगमनेर येथे सुरू असल्यामुळे तो हाणून पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी, महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केलेल्या मागणी नुसार ही मोहीम राबविली जाणार आहे. ज्या महिलांनी ऑफलाईन फॉर्म भरून दिले आहे परंतु त्यांचे अजून ऑनलाईन फॉर्म भरले गेले नाही त्यांनी पुन्हा नव्याने फॉर्म भरून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय गांधी निराधार योजना संगमनेर अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी केले आहे.

योजना सुरू झाल्यापासून संगमनेर तालुक्यात फक्त ५०% महिलांची ऑनलाइन नोंदणी झालेली दिसून येत आहे त्यामुळे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार संगमनेर येथे दिनांक 25 व 26 जुलै रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत प्रत्येक गावामध्ये विशेष मोहीम अंतर्गत राहिलेल्या सर्व पात्र महिलांची नोंदणी करून घेतली जाणार आहे.

दोन दिवस होणाऱ्या विशेष मोहिमेसाठी भारतीय जनता पार्टी संगमनेर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ पमुख, सुपर वॉरियर, शक्ती केंद्रप्रमुख व त्या त्या गावातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी गावात योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांशी संपर्क साधून लाभ मिळवून द्यावा. आपल्या गावातील महिला योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी.

या विशेष मोहिमेसाठी ग्रामस्तरावर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आशासेविका, सीआरपी बचतगट, अध्यक्ष सचिव सदस्य बचत गट, ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर, पर्यवेक्षिका, सेतू ऑपरेटर उपस्थित राहणार आहे. तरी सर्व महिला भगिनींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती अमोल खताळ, वैभव लांडगे, कविता पाटील, शरद गोरडे, रौफ शेख, अतुल कासट, सरपंच संदीप देशमुख, मयूर दिघे, सरपंच श्रीनाथ थोरात, सरपंच शशिकला पवार, सरपंच रवी दातीर, सरपंच घनशाम भारस्कर, सरपंच विकास घुले, नवनाथ जोंधळे, सोमनाथ बढे, रोहिदास साबळे, हरीश वलवे, शिवाजी आहेर, संदेश देशमुख, सतीश गोपाळे, रोहिदास गुंजाळ, सुयोग गुंजाळ, सुरेश लांडगे, शशिकांत मतकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!