मेंढपाळ धनगर समाजाला न्याय मिळवून दिला.

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

रविवार दि .21/07/2024 रोजी वावरथ जांभळी ता.राहुरी जि.अहिल्यानगर येथिल धनगर समाज मेंढपाळ श्री.कृष्णा बाचकर आणि श्री.सुनिल चोरमले हे धनगर समाज मेंढपाळ वरवंडी ता.संगमनेर येथिल थापलींग डोंगरावर मेंढ्या चारत असतांना वरवंडी येथिल काही अपप्रवृत्तीच्या लोकांकडून मेंढ्या जखमी केल्या तसेच मेंढपाळांना धक्काबुक्की करण्यात आली. त्याची दखल घेत सकल धनगर समाजाचे श्री.मनोहर टेंगळे यांनी याबाबत पत्रकारांना ,समाजाचे प्रमुख कार्यकर्त्यांना कळविले.त्याची दखल घेत यशवंत सेना जिल्हा उपप्रमुख श्री.सुभाषराव हळनोर ,श्री.एकनाथ बरकडे, श्री.गणेश खेमनर,श्री.रविंद्र दातीर, श्री.अशोक ज-हाड यांचेसह पंचक्रोशितील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने जमले त्यामुळे पोलिस स्टेशनला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले. या तक्रारीचा पाठपुरावा करत याची गंभीर दखल घेत आश्वि पोलिस स्टेशनचे पी.आय.पवार साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी सदर अपप्रवृत्तीचे गन्हेगार यांना ताब्यात घेतले. सदर गुन्हेगार यांचेकडून गुन्ह्याची कबुली देण्यात आली. त्यांचेवर कडक कार्यवाही करत त्यांचे कडून सदर मेंढपाळांना जखमी मेंढ्या यांची आर्थिक नुकसान भरपाई मिळवून देत अनमोल अशी मदत केली.याकामी संगमनेर पोलिस उपधीक्षक श्री.सोमनाथ वाकचौरे साहेब,आश्वि पोलिस स्टेशनचे पी.आय.पवार साहेब यांनी खुप मोलाचे सहकार्य केले.धनगर समाजातील वरिल प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरील अन्याय विरुध्द आवाज उठविला.त्याबद्दल या सर्व कार्यकर्त्यांचे तसेच पोलिस अधिकारी यांचे सकल धनगर समाज संगमनेर तालुक्याचे वतीने विविध स्तरातून कौतुक करुन त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!