मनाची वृत्ती बदलण्याची ताकद हरिनामात असते- ह.भ.प.कविराज महाराज झावरे
पिंपरणे येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तरत्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे,मनोवृत्तीत बदल झाला तरच खऱ्या अर्थानंसमाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधानलाभेल. मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्तअध्यात्मामध्ये व हरिनामात आसल्याचे प्रतिपादन ह भ प कविराज महाराज झावरे यांनी केलेसंगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे सुवर्ण महोत्सवी 51 वर्षाची परंपरा असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने सांगता झाली. यावळी ते बोलत होते.
सप्ताहाचे सुवर्ण महोत्सवी 51वे वर्ष असल्याने सप्ताहाचे आगळे वेगळे रूप बघायला मिळाले
पुढे बोलतांना ह भ प कविराज महाराज झावरे म्हणाले की, दिशाहिन समाजाला योग्य दिशा देण्याची ताकद फक्त अखंड हरिनाम सप्ताहातच आहे मनुष्य अज्ञान झाकण्यासाठी पाप करतो दुसऱ्याच्या सुखाचा नाश करतो त्याला कंस म्हणतात दुःख रुपी विष पचवल्या शिवाय सुखाचे लोणी मिळत नाही.
म्हणून कंसरुपी अधर्माचा नाश करण्यासाठी श्रीकृष्माला आठवा जन्म घ्यावा लागला. तसेच बाळगोपाळांबरोबर एकत्र काला करणे, जेवण करणे यात देवाची दुरदृष्टी होती
या सप्ताहात सकाळी वारकऱ्यांना नाश्ता व संध्याकाळी किर्तन संपल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होत असे सात दिवस धार्मिक कार्यक्रम काकडा,ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन,हरिपाठ, भारूड, कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रम पार पडले
सप्ताह सांगता दिवशी ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ व विठ्ठल रुक्माई प्रतिमेची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावात रस्त्यावर ठिकठिकाणी सडा रांगोळी काढण्यात आली होती ठिकठिकाणी महिलांनी विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजनही केले मिरवणूक छत्रपती चौकात आल्यावर तरुणांनी मानाची दहीहंडी फोडण्याचे कौशल्य दाखवले महिला पुरुष तरुणांनी सनईच्या सुरात भक्ती गीतांवर नाचण्याचा तर काहींनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला मिरवणूक सप्ताहस्थळी आल्यानंतर ह भ प कविराज महाराज झावरे यांचे सुस्राव्य कीर्तन झाले किर्तन नंतर आलेल्या भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला गेली 51 वर्ष सप्ताह काळात महाराजांची जेवण व निवास सेवा विलास काळे आणि कुटुंबीय करीत आहे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला
सप्ताह काळात धार्मिक कार्यात गावातील हनुमान भजनी मंडळ यांनी परिश्रम घेतले
रामनाथ गिरी,बाळासाहेब साळवे कृष्णा रक्टे,बाळू कर्पे,प्रकाश साळवे , रावसाहेब ठोंबरे,संपत राहींज,सुनिल साळवे, त्रिंबक गिरी चंदू ठोंबरे सुदाम वाकचौरे, नाना वाकचौरे, अण्णासाहेब दिवेकर संजय भादेकर पोपट जाधव सोपान रक्टे आदीनी धार्मिक कार्यात सहकार्य केले
तर सप्ताह यशस्वी पार पाडण्यासाठी सरपंच नारायण मरभळ,काका गायकवाड अरुणसाहेब देशमुख शिवराम वाकचौरे दिनकरराव वाकचौरे राजेंद्र देशमुख अण्णासाहेब वाकचौरे उपसरपंच मिनिनाथ जोर्वेकर सर, रवी रोहम बाबासाहेब राहिंज सर अजित मांडे अजित देशमुख, गंगाराम वाकचौरे, विनोद साळवे उत्तमनाना राहींज राहुल बागुल पत्रकार सुभाष भालेराव,दिनकर ठोंबरे निलेश बागुल शंकर देशमुख शुभम काळे किशोर जोर्वेकर,संजय बागुल,कल्याण जोर्वेकर,राहुल निकमआदी सह या सप्ताहासाठी ग्रामस्थ, गावातील सर्व युवा मंडळे, सामाजिक संस्था, सहकारी संस्था, दुध संस्था, पतसंस्था, विद्यार्थी, शिक्षक, गगनगिरी महाराज विद्यालय, ग्रामपंचायत, जि.प्र.प्राथमिक शाळा या सर्वांचे सहकार्य लाभले.
