असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी” या उक्तीप्रमाणे सर्वांनी डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे -डॉ. नंदकुमार गोडगे

आत्मा मालिक हॉस्पिटल व डॉ. गोडगे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने  मोफत नेत्र तपासणी व औषधोपचार

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

आत्मा मालिक हॉस्पिटल कोपरगाव व डॉ. गोडगे हॉस्पिटल तळेगाव दिघे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी मोफत नेत्र तपासणी व मोफत औषधोपचार तसेच सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये शंभरहून अधिक रुग्णांनी मोफत नेत्र तपासणी करून औषध उपचार घेतले. आत्मा मालिक येथील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. मोबाईलच्या वाढत्या प्रमाणामुळे डोळ्यांचे विविध आजार होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने डोळ्याची काळजी घेऊन वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करून ग्रामीण भागातील गरजू रुग्णांची निश्चितच सेवा केली जाईल असे प्रतिपादन डॉ. नंदकुमार गोडगे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन उगले यांनी केले तर आभार सौरभ ठोंबरे व सुनील गोरडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!