*निमगाव जाळी येथे सरदार त्रिंबकजी डेंगळे यांची पुण्यतिथी साजरी
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी
एक सामान्य हूजऱ्या आपल्या असामान्य कर्तबगारीने मराठी राज्याच्या कारभारी पदापर्यंत पोहोचला संपूर्ण हिंदुस्तानभर आपला जम बसवीत असलेल्या इंग्रजी सत्तेला त्याने एकट्याच्या बळावर काही काळ आव्हान दिले व या सत्तेला सळो की पळो करून सोडले अशा असामान्य कर्तृत्ववान शूर सरदार त्रिंबकजी डेंगळे यांची 195 वी पुण्यतिथी निमगाव जाळी या यांच्या जन्मगावी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम पुणे दरवाजा या ठिकाणी तर नंतर त्यांचे वास्तव्य असलेल्या वाड्यात महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव शिवाजीराव जोंधळे साहेब यांच्या हस्ते व त्रिंबकजी डेंगळे यांचे वंशज श्रीमती जाधव यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन व अभिवादन करण्यात आले यावेळेस माजी सरपंच अमोल जोंधळे,उपसरपंच सुरेश डेंगळे,सदस्य दिलीप डेंगळे,माऊली डेंगळे,सुमित डेंगळे, मा.प्राचार्य विलास जाधव,संजय थेटे, डॉ.वदक पो.पा.दिलीप डेगळे,लंगोटे गुरु, रामू बिडवे,तुकाराम पवार,प्रा.डेंगळे,भाऊ डेंगळे,वदक, विठ्ठल भडकवान, विलास डेंगळे,आदी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.