श्रीमती सोनार यांना दीपस्तंभ शिक्षक सन्मानपत्र प्रदान

इगतपुरी –

जिल्हा परिषद नाशिक व शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या समन्वयातून आयोजित दीपस्तंभ – शिक्षक सन्मान सोहळा २०२५-२६ अंतर्गत जिल्हा परिषद दरेवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती वंदना सोनार यांना विद्यमान शैक्षणिक वर्षात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्रशिक्षणात मास्टर ट्रेनर म्हणून उत्तम कामगिरी केल्याबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार श्री.ओमकार पवार व प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती साईलता सामलेटी यांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक दीपस्तंभ शिक्षक सन्मानपत्र व भेटकार्ड प्रदान करुन गौरविण्यात आले आहे. याबद्दल श्रीमती सोनार यांचे इगतपुरी तालुका पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी श्रीमती मंजुषा साळुंखे, केंद्रप्रमुख विजय पगारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत गावंडा, मुख्याध्यापक संजय गातवे, सहशिक्षक महेश खैरनार व काळुस्ते केंद्रातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!