संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील स्वर्गीय चिमाजी विठोबा धुळगंड यांचा दशक्रिया विधी 25- 11- 2024 ला मुळातिरी पार पडणार.
संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील चिमाजी विठोबा धुळगंड यांचं वृद्धपकाळाने 16-11-2024 निधन झालं, तर त्यांचा दशक्रिया विधी मांडवे बुद्रुक येथील मुळा नदी वरती हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज चोरमले यांच्या प्रवचनाने पार पडणार आहे.
मांडवे. बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्य काळामध्ये चिमाजी धुळगंड यांचं मोठं मोलाचे योगदान राहिला आहे, ग्रामपंचायत कार्य काळामध्ये अविरतपणे पंधरा वर्षे त्यांनी गावचा कारभार बघितला. गावच्या कारभार बघत असताना गावामध्ये येणाऱ्या अडीअडचणी ते पोलीस स्टेशन पर्यंत न जाता जागेवर बसून त्या अडचणींना सोडवायचं काम चिमाजी विठोबा धुळगंड यांनी केलं.
तर त्यांच्या दशक्रिया विधी निमित्त अनेक मान्यवरांची हजेरी असणार आहे.
त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून त्या परिवाराच्या देखील मांडवे बुद्रुक गावचे विकासामध्ये मोलाचे योगदान असणार आहे.
