संगमनेर डोंगरी जिल्हा तात्काळ घोषित करा अन्यथा प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आक्रोश उपोषण करणार – आत्माराम देशमुख
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर हे आढळा-प्रवरा- म्हाळुंगी त्रिवेणी संगमावर वसलेले जुने ऐतिहासिक शहर असून राजूर, अकोले, संगमनेर, ग्रामीण घारगांव, राहाता, कोपरगांव व श्रीरामपूर तालुके असे सात तालुक्यांच्या संगमनेर मध्यवर्ती ठिकाण असून सर्वांना सोयीस्कर असे ठिकाण आहे त्यामुळे संगमनेर डोंगरी जिल्हा करावा. अन्यथा १६ डिसेंबर पासून बेमुदत उपोषण उपविभागीय अधिकारी साहेब संगमनेर यांचे कार्यालयावर उठाव आक्रोश उपोषण, आंदोलन सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत करण्यात येणार असल्याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख यांनी केले आहे
देशमुख यांनी निवेदनात केलेली मागणी पुढील प्रमाणे
१- अहिल्यानगरचे बरोबरीचे संगमनेर जिल्हा डोंगरी सुरु करावा.
पुणे- नासिक, मुंबई- अहिल्यानगर याचे मध्यभागी असलेले जुने होय छत्रपती
शिवरायांचे काळात देखील उप परगाना होय.
२- महाकाय विस्तीर्ण संममनेर व अकोलेचे विभाजन करुन घारगाव व राजूर तालुके सुरु करावेत
३- राजूर, अकोले, संगमनेर, ग्रामीण घारगांव, राहाता, कोपरगांव व श्रीरामपूर तालुके असे ७ मिळून संगमनेर डोंगरी जिल्हा करावा.
४- पुणे व्हाया संगमनेर- नासिक हायस्पीड रेल्वेचे काम तात्काळ सुरु करावेत. संगमनेर पठारावर या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग होवून मोठी एम. आय. डी. सी व अन्य पूरक उद्योगधंदे मिळून ३ ते ४ लाख लोकांना रोजगार उपलब्ध होण्याची संधी करून द्यावी.
पुणे- संगमनेर- नासिक हे तीनही जिल्हे एकमेकांना जोडून हायस्पीड रेल्वेने जोडून विकासाची गंगोत्री घराघरात पोहचवावी ही नम्र विनंती.
[शासनाने अहिल्यानगर जिल्हयात कोणतीही निवडणूक घेवू नये जिल्हा व मग निवडणूक कार्यक्रम. ]
