येंधे परिवाराच्या त्रिमूर्ती मॉलच्या त्रिमूर्ती होलसेल नवीन इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स प्लंबिंग या विभागाचा उद्घाटन समारंभ महंत अरुणगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर शहरात अकोले बायपास रस्त्यालगत येंधे परिवाराच्या त्रिमूर्ती मॉलच्या त्रिमूर्ती होलसेल नवीन इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स प्लंबिंग या विभागाचा मकर संक्रांतीनिमित्त भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला
या भव्य लाइटिंग दालनाचे उद्घाटन अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती महंत जगद्गुरु अरुणगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते झाले
यावेळी महंत अरुणगिरी महाराजांचा सन्मान सत्कार करण्यात आला
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत शिवाजीराव खळे सर लालूशेठ दळवी, दिलीपशेठ कारिया, आर एल वर्पे, दिनेश गोस्वामी,संदीप आंधडे, रोहनभाई ठक्कर, विहान ग्रुप मुंबई, विलास कारभारी येंधे , रवींद्र येंधे आधीसह मित्रमंडळी व्यावसायिक ग्रामस्थ पाहुणे तालुक्यातील मान्यवर मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
यावेळी महंत अरुणगिरी महाराज यांनी येंधे परिवाराचे कौतुक करत त्यांच्या नवीन होलसेल दालनास आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या
यावेळी त्रिमूर्ती मॉल चे मालक नानासाहेब येंधे यांचे चिरंजीव संकेत येंधे यांचा वाढदिवसही महंतअरुणगिरी महाराज यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला
त्रिमूर्ती मॉलमध्ये इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स व प्लंबिंग चे सर्वसामान होलसेल दरात मिळणार आहे घराच्या सुशोभीकरणासाठी सर्व लाइट्स, नाईट लॅम्प, वॉल लॅम्प,फिलिप्स, हॅरीसन, यासारख्या इंटरनॅशनल कंपनीचे लाईट्स अधिक व्हरायटीसह एकच छताखाली उपलब्ध होणार आहे
यावेळी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत सत्कार नानासाहेब राधाकिसन येंधे संदीप राधाकिसन येंधे, प्रदीप राधाकिसन येंधे, संकेत नानासाहेब यंधे, ओम संदीप येंधे यांनी केले
यावेळी येंधे परिवारासह नातलग आप्तेष्ट तसेच तालुक्यातील विविध पदाधिकारी सावरगाव तळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आलेल्या पाहुण्यांनी त्रिमूर्ती मॉल चे कौतुक करत त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी खुळे सर यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश खरात यांनी केले
