कनोली विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा सौरऊर्जेकडे ऐतिहासिक टप्पा

संगमनेर

संगमनेर तालुक्यातील कनोली येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत सौरऊर्जेच्या वापराला प्राधान्य देत सोलर प्रकल्पाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न केले. या सोलर प्रकल्पाचे उद्घाटन इंद्रजीत थोरात यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी कारखाना संचालक सतीश वर्पे, खरेदी-विक्री संघाचे संचालक सिताराम वर्पे, बालाजी दूध संस्थेचे माजी चेअरमन बंडू वर्पे, लहानभाऊ वर्पे, प्रकाश वर्पे, मिनिनाथ वर्पे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सोसायटीचे चेअरमन सुभाष वर्पे, व्हाईस चेअरमन सुमन वर्पे, सचिव रविंद्र वर्पे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

बालाजी दूध संस्थेचे चेअरमन अरुण वर्पे, व्हाईस चेअरमन आकाश वर्पे, सचिव भाऊसाहेब वर्पे, गोकुळ पतसंस्थेचे चेअरमन रोहिदास वर्पे, व्हाईस चेअरमन संपत जगताप, मॅनेजर रघुनाथ वर्पे यांच्यासह विविध संस्थांचे संचालक, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी इंद्रजीत थोरात यांनी सौरऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, सोलर प्रकल्पामुळे विजेची मोठ्या प्रमाणात बचत होणार असून पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे. पारंपरिक ऊर्जेच्या तुलनेत सौरऊर्जा ही स्वच्छ, सुरक्षित व कमी खर्चिक ऊर्जा मानली जाते. संस्थेसाठी सोलर प्रणाली भविष्यात आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्याचप्रमाणे बालाजी दूध संस्था व गोकुळ पतसंस्था या दोन्ही संस्थां च्या कारभारावर समाधान व्यक्त करत भविष्यात तिन्ही संस्थांना शुभेच्छा दिल्या

कनोली येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीने घेतलेला हा पुढाकार ग्रामीण विकासाच्या दृष्टीने प्रेरणादायी असून गावाच्या प्रगतीकडे टाकलेले एक सकारात्मक पाऊल म्हणून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!