शेळ्यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने मारल्या दोन बकऱ्या,
संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
आश्वी लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील एका शेतकऱ्याच्या शेळ्यांच्या बंदिस्त गोठ्या गोठ्यात घुसून दोन बिबट्याने हल्ला चढवला हल्ल्यात दोन बकऱ्या जागी ठार केल्या. शेतकरी लक्ष्मण हनुमंता गायकवाड यांच्या गोठ्यात मंगळवारी रात्री बिबट्यांचा हा थरार गायकवाड यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून ह्याची देही ह्याची डोळा अनुभवला.
याबाबतची अधिक माहिती अशी की, आश्वी खुर्द शिवारातील प्रवरा उजव्या कालव्यालगत येथील शेतकरी लक्ष्मण हनुमंता गायकवाड यांची गट नंबर १८३ मध्ये वस्ती आणि शेळ्याचा मोठा बंदिस्त गोठा आहे. या गोठ्यात त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. मंगळवार दि.१४ मार्च रोजी नेहमी प्रमाणे रात्री ९.३० वाजेच्या सुमारास गायकवाड हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून गोठ्याची पाहणी करत होते. त्यावेळी त्यांना गोठ्यातील शेळ्याची बकरे घाबरलेल्या अवस्थेत दिसली. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही फिरवून पाहिला असता एका बिबट्याने गोठ्यात येऊन एका करडावर हल्ला चढवल्याचे त्यांच्या नजरेस पडले. त्यानंतर त्यांनी आरडाओरड करत गोठ्याकडे धाव घेतली असता बिबट्याने गोठ्यातून पलायन केले. यावेळी गोठ्याच्या बाजूला दोन बलदंड बिबटे गायकवाड यांच्या दृष्टीस पडले, त्यामुळे घाबरलेल्या गायकवाड यांनी प्रसंगावधान राखत गोठ्यात जाऊन पाहिले असता बिबट्याने शेळीचे दोन बकरे ठार केल्याचे त्याच्या लक्षात आले.यानंतर गायकवाड यांनी वनविभागाला फोन करुन याबाबत माहिती दिली. बुधवारी या हल्ल्याचा वनविभागाने पंचनामा केला आहे. दरम्यान शेतकरी लक्ष्मण हनुमंता गायकवाड यांचे यामुळे अंदाजे २० हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले असून वनविभागाने त्यांना तात्काळ मदत मिळवून द्यावी अशी मागणी परिसरातील शेंतकऱ्यानी केली आहे.
