.समाजातील सर्व घटकांत एक आदरयुक्त प्रतिष्ठित व्यक्तीमत्व….स्वर्गीय रामनाथ कोटकर..
कष्टातुनी संसार फुलविला,उरली नाही साथ आम्हांला !..आठवण येते क्षणा-क्षणाला…
 आजही तुमची वाट पहातो,यावे तुम्हीं पुन्हा जन्माला!… 
संगमनेर / लोकवेध live न्यूज

 अंभोरे ता.संगमनेर जि.अहमदनगर येथिल सह्याद्रीचे पर्वत रांगेत वसलेल्या छोट्या अंभोरे खेडे गावात स्वर्गीय भाऊराव कोटकर वडील आणि आई स्वर्गीय पार्वताबाई यांचे पोटी स्वर्गीय रामनाथ भाऊराव कोटकर यांचा सन दि.4/06/1948 रोजी जन्म झाला.स्वर्गीय भाऊराव कोटकर यांना एकुण आठ मुले.थोरला स्वर्गीय रामनाथ,पांडूरंग,दशरथ आणि डॉ.नानासाहेब,सौ.दगडाबाई,झुंबरबाई,अहिल्याबाई,नाणीबाई आणि जनाबाई पैकी रामनाथ,हा सर्वात मोठा म्हणजेच थोरला!..प्रथमापासुन स्वर्गीय रामनाथ भाऊराव अर्थात भाऊ अतिशय शांत,कुशाग्र,तल्लीन बुध्दि,मनमिळावू आणि विनम्र स्वभाव…
 स्वर्गीय भाऊराव कोटकर वडील हे शेतकरी कुटंबातील असल्यामूळे शेती करने,हाच प्रमुख त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणून ते शेती करत.त्यांची घरची परिस्थिती अतिशय हलाकिची आणि गरिबीची असल्याने स्वर्गीय रामनाथ भाऊराव कोटकर (भाऊ) यांनी आपले शिक्षण पुर्ण केले आणि वडिलांची परंपरागत शेती सुरु करणे अधिक पसंद केले. त्यामुळे वडिलांनाही कुटूंब चालविणेसाठी आपली मोलाची मदत होईल या उदात्त हेतूने शेती सुरु केली.शेंद्रिय पध्दतिची शेती करणे याबाबत भाऊंना अधिक चांगले वाटत.शेंद्रीय पध्दतीची शेती करुन एक उच्च प्रतिची,कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेणे हे ब्रिद अंगीकारुन त्यांची शेती करण्याची सवय असे.त्यांना दोन मुले आणि एक मुलगी पैकी थोरला स्वर्गीय देवराम हा होय तर दुसरा श्री.सिताराम मुलगी सौ.संगीता सुन ग.भा.नंदा देवराम,सौ.कविता सिताराम,सौ.अर्चना विकास,सौ.निकीता विशाल आणि..तसेच नातु चिं.वैभव,प्रसाद,जयेश आणि नात-शितल,प्रतिक्षा पुतने-श्री.विकास,विशाल असा हा त्यांचा परिवार होत.थोरला मुलगा देवराम यांचे निधन झाल्याने स्वर्गीय रामनाथ भाऊंना मोठा धक्का बसला आणि तेथूनच भाऊंना खुप त्रासाला सामोरे जावे लागले कारण शेतीची कामे व इतर कामात मदत करणारा देवराममुळे संपुर्ण शेतीची कामाची जबाबदारी स्वर्गीय रामनाथ भाऊवर येवुन पडली .सिताराम आणि सुन हे दोघेही प्राथमिक शिक्षक असल्याने नोकरी निमित्ताने कायम बाहेर  गावी राहत.तरी देखिल ते आपले आई वडिलांची खुप काळजी घेत. त्यास सुन कविता हिची देखिल साथ मिळत असे.सुन-ग.भा.नंदा नातु-वैभव नात-शितल यांची पुर्ण जबाबदारी स्वर्गीय रामनाथ भाऊंनी यशस्वी पार पाडली.रिकाम्या वेळेत रामायण,नवनाथ भक्ती सार,भागवत,ज्ञानेश्वरी अशा ग्रंथाचे वाचन करी त्यामुळे अध्यात्माचा दांडगा अभ्यास त्यांना होता.यामुळे आपल्या मित्र परिवारात संतांचे विचार,शिकवण याप्रमाणे आपली वर्तणूक असावी असा सल्ला ते नेहमी देत.गावातील सप्ताह,धार्मिक कार्यात स्वत:ला झोकून देत कारण सप्ताहा काळात सप्ताहाचा प्रसाद (स्वयपाक) असो की,एखाद्या लग्नाचा स्वयपाक तो कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मोबदल्याचीअपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणे स्वत: करत त्यासाठी त्यांनी कधी स्वत: लाज बाळगली नाही.म्हणजे इतरांना एक चांगली प्रेरणा यातुन मिळत असे त्यामुळे गावच्या प्रमुख प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये भाऊंचा प्रमुख अग्रक्रमाने नाव घेतले जाते.त्यांचा नित्यदिन क्रम हा सकाळी उठुन शेतास फेर फटका मारणे,अंघोळ करणे,देवपूजा करणे आणि गावात निघतांना काही फुले आपल्या बरोबर घेत नित्य नियमाने गावातील विठ्ठल-रुख्माई मंदीर,हनुमान,महादेव,काळुआई मंदिरात जावुन अर्पण करुन दर्शन घेणे आणि.मग आपल्या मित्रांसह गावातील मोक्याची जागी बसुन एकमेकांची सुख,दु:खे आणि आपण करत असलेली शेती आणि शेती उत्पन्न यावर सवांद साधत चालू परिस्थितीवर गप्पा रंगत त्यात ते स्वत: चहा पाणी यासाठी खर्च करत आणि एकमेकांच्या सुख,दु:ख यावर आस्थेवाईक पणे  चर्चा करुन चौकशी करत.यातुन त्यांच्या अंगी असलेले माणुसकीचे दर्शन घडत.त्यांचा परखड आणि स्पष्ट बोलणे,जे काही बोलायचे ते अगदी जे ओठावर तेच तोंडावर बोलणे भले आपल्या बोलण्याचा कुणाला राग आला,वाईट वाटले तरी बेहत्तर !.परंतु जे खरे आहे तेच  बोलणे आणि चुकीचे असेल तर हे तुझे चुकीचे आहे असे स्पष्ट सांगणा-यापैकी ते एक होत.त्यामुळे एक चांगला मित्र परिवार त्यांनी जमवीला होता.त्यांचा स्वभाव स्पष्टोक्ती,नेहमी ख-याचा स्विकार करणे आणि खोटयांना आपल्या भाषेत त्यांची शाब्दिक चिरफाड करत त्यामुळे त्यांची एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली. समाजात त्यांचे वजन वाढले आणि त्यांचा शब्द, हे प्रमाण मानुन त्यांचा नाव लौकिक झाला.आदराने त्यांना सर्व ‘भाऊ’ या नावाने संबोधित असे.ते युवक-तरुणांना तुम्ही नेहमी निरोगी रहा,व्यसनापासुन दुर राहत चांगले शिक्षण घ्या,चांगले मित्र मिळवा,त्यांच्याच संगतीत राहुन स्वत:चे पायावर उभे रहा अथवा व्यवसाय सुरु करुन स्वत:ची कुटंबाची आर्थिक प्रगती करावी तसेच लहान-मोठ्यांचा सन्मान करत आदर राखावा.आजचा युवक हा देशाचा भावी आधारस्तंभ आहे.असे नियमित सांगत.तरुणांना चांगले मार्गदर्शन करत.समाजातील सर्व घटकांत स्वर्गीय रामनाथ उर्फ भाऊंनी आदराचे स्थान निर्माण केले.त्यामुळे गावात एक आदरयुक्त प्रतिष्ठित व्यक्तीमत्व म्हणून त्यांचेकडे सर्वजन बघत.त्यातुन त्यांची सामाजिक कार्याची रुची वाढू लागली आणि त्यांनी सामाजिक कार्याचा श्रीगणेशा केला.आपले प्राथमिक शिक्षण पुर्ण करुन गावात मुलांना शैक्षणिक सुविधा मिळावी म्हणून गवात शिक्षणाची सोय व्हावी या उदात्त हेतूने, मल्हारराव होळकर विद्यालयाची उभारणी केली.उभारणीमध्ये भाऊंचा सिंहाचा वाटा आहे.एवढेच नाही तर इतर गावात धार्मिक वातावरण राहते. त्यामुळे सर्व एकोप्याने राहतात याच भावनेतून इतर मित्रांच्या मदतीने गावात  मुख्य मंदीर,विठ्ठल-रुख्मिणी मंदीर,मारुती मंदीर,महादेव मंदीर,काळूआई ,बिरोबा महाराज यांचे जिर्नोध्दार कामी भाऊंनी मोलाची कामगिरी केली.याकामी देणगी स्वत:पासुन सुरु केली आणि या प्रश्नांची सोडवणूक केली.ते खुप धार्मिक होते यातुन त्यांचे मोठेपण सिध्द होते.व्यवहार खुप पारदर्शक त्यामुळे त्यांची स्वत:ची पत वाढली.नेहमी सत्य आणि खरे बोलणे हा त्यांचा मुळ स्वभाव!..यामुळे जे ओठांवर तेच तोंडावर बोलणे यामुळे अनेकांना त्यांचा हा स्वभाव खुप आवडे परिणामी अनेक मोठा मित्र-परिवार त्यांनी निर्माण केला.अगदी त्याच प्रमाणे नाते संबधात देखील असेच!..आपल्या या स्पष्ट आणि तो तोंडावर बोलणे यामुळे अनेकजन त्यांच्याशी बोलतांना सांभाळून बोलत असे.एखादा चुकीचे करत असेल तर त्याला ते समजावून सांगत.ही वृत्ती त्यांनी स्वत:पासुन अंगीकारल्याने त्यांना व्यक्तिगत खुप समाधान वाटत असे.सामाजिक,धार्मिक,राजकीय, शैक्षणिक,कृषी क्षेत्रांत देखील भाऊंनी एक आपला स्वतंत्र दरारा निर्माण केला.अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवुन मुलगा सिताराम कोटकर हे प्राथमिक शिक्षक असून ज्ञानदानाचे काम उत्तम प्रकारे सांभाळून गरीब व होतकरू मुलांना शैक्षणिक कामात मदत करण्यात नेहमी पुढे आहे. ज्ञानदानाच्या   कार्याबरोबरच  देवदेवतांना मंदिराच्या कामात मदत करणे इत्यादी काम ते वडिलांच्या शिकवणुकीतून पुढे नेत आहेत. वडिलांच्या विचाराचा वारसा पुढे नेऊन त्यांनी जीवनात सत्य बोलणे सत्य वागणे या विचारामुळे मित्रपरिवार गोतावळा सर्वांमध्ये सिताराम हे सर्वांचे लाडके आहेत वडिलांच्या विचारानेच वागायचं आणि वडिलांचे विचारच समाजापर्यंत पोहोचवायचे यामुळे  ख-या अर्थाने भाऊंचा विचाराचा वारसा हा पुढे चालू ठेवला आहे
 भाऊ- डॉ.नानासाहेब कोटकर यांनी देखील त्यांच्या विचारापासुन प्रेरणा घेवुन अंभोरे गावात ‘साईबाबा’ मंदिर उभारणी केली.या उभारणीत आर्थिक,मंदीर पुर्णात्वास नेण्यासाठी सिंहाचा वाटा आहे.ते देखील आपला पशु- वैद्यकिय व्यवसाय करत तो सांभाळून धार्मिक कार्यांत नेहमी अग्रेसर.अनेक संत-महतांचा सहवास त्यांना मिळत असल्याने धार्मिक कार्यात सर्वात पुढे आहे.आजही प्रत्येक गुरूवारी साईबाबा मंदिर,परिसरात त्यांचेच मार्गदर्शनाखाली अन्नदान भाविक-ग्रामस्थ करत आहे.तसेच राष्ट्र संत स्वामी जनार्दन मौणगिरी महाराज,यांचे दत्त पावन आश्रमात देखील प्रत्येक सोमवार भजनाचे आयोजन त्यांचे मार्गदर्शनाखाली  करण्यात येत आहे.त्यामुळे त्यांनी देखील एक चांगला मित्र-परिवार निर्माण करुन ख-या अर्थाने भाऊंचा विचाराचा वारसा हा चालू ठेवला आहे. डॉ.नानासाहेब,श्री.पांडूरंग, श्री.दशरथ या बंधूंचा खुप एक विचार कधीही यांचेत वाद-विवाद नाही.एकमेकांस सहकार्य आणि आदर सन्मान आजतागायत ते एकमेकांस देतात.त्यामुळे अंभोरे परिसरात या परिवाराची एक आणखीन वेगळी ओळख आहे.असं एक प्रभावशाली व्यक्तिमत्व …असलेले स्वर्गीय रामनाथ (भाऊ)  मंगळवार दि.18/06/2024 हा दिवस रामनाथ भाऊंचा जीवनप्रवासाचा अखेरचा काळा दिवस ठरला. ‘जीवनाच्या वाटेवर चालतांना पैशाची श्रीमंती असलेली अनेक माणसं भेटतील परंतु मनाची श्रीमंती असलेली मानसं भेटत नाही!..आणि हेच महत्वाचे काम केले.मनाची श्रीमंती असलेली मानसं भाऊंनी कमविलि आज भाऊ आपल्यात नाही परंतु त्यांनी केलेले कार्य कुटुंबासाठी,गावासाठी,मित्र परिवारासाठी आजही स्मरणात आहे.त्यांचे विचार हे सतत आपणास प्रेरणा देत राहिल. त्यांच्या अफाट व्यक्तिमत्वाची जाणीव सर्वांनाच होत आहे स्वर्गीय रामनाथ भाऊंचे आज प्रथम पुण्यस्मरण त्यानिमित्ताने भाऊंना  भावपूर्ण श्रद्धांजली
.स्वर्गीय रामनाथ भाऊ  हे आमचे खरे मार्गदर्शक होते.एक चांगल्या मार्गदर्शकास मुकलो आहोत.त्यांचा जिवनपट उलगडत असतांना शेवटी असे म्हणेल की,’क्षणो-क्षणी आमच्या मनी,तुमचीच आहे आठवण…
 हिच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण!…हिच भाऊंना अखेरची शब्द रुपी श्रद्धांजली
……………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!