33/11 KV सब स्टेशन मधील 5MVA क्षमतेचे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर चे उद्घाटन.

माढा तालुका / लोकवेध live न्यूज / हनुममंत मस्तुद

माढा तालुक्यातील सोलंकरवाडी या गावा मध्ये ३३/११ केव्ही सबस्टेशन मध्ये बसवण्यात आलेल्या ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर चे उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातुन 5 MVA क्षमतेचा ॲडिशनल टार्न्सफार्मर मंजुर करून बसविण्यात आला होता त्याचा उद्घाटन कार्यक्रम भारतीय जनता पार्टी माढा तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष श्री. योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधा योजनेतून तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांच्या माध्यमातुन मंजूर करण्यात आलेल्या सोलंकरवाडी ते पडसाळीकडे जाणाऱ्या रस्त्याचे लोकार्पण सोलंकरवाडी गावचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वामन यादव, भाऊराव भांगीरे, बाळासाहेब माळी, शंकर माळी, सरपंच रमेश शेंडगे यांच्या हस्ते नारळ वाढवुन करण्यात आले. यावेळी सोलंकरवाडीचे माजी सरपंच बाबासाहेब पांढरे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनाजी लादे, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. गणेश सुर्वे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री शहाजी यादव, तंटामुक्तीचे अध्यक्ष महेश पाटील, प्रविण पाटील, पांडुरंग राऊत, ॲड. रामचंद्र निंबाळकर, अमोल काटकर, शहाजी माळी, शहाजी भांगे, नवनाथ जाधव, शहाजी जाधव, राहुल जाधव, सुरज मोरे, सोमनाथ वाघमारे, दीपक सोलंकर, अर्जुन भांगिरे, भाऊराव भागिरे, गणेश माळी, संदीप गलांडे, बाळासाहेब माळी, विशाल राजगे, किरण मुटकुळे, शिवाजी जगदाळे, दिग्विजय पाटील, लखन पवार यांच्यासह सोलंकरवाडी गावातील तसेच परिसरातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!