१ जानेवारी २०२५ पर्यंतचे तुकडबंदी व्यवहार नियमित होणार – ना बावनकुळे
आमदार अमोल खताळ यांच्या लक्षवेधी वर महसूलमंत्री बावनकुळे यांचा महत्व पुर्ण निर्णय..
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
विधान सभेच्या पावसाळी अधिवेशनात आ.अमोल खताळ यांनी नगर पालिका हद्दीत व हद्दी लगत नागरी वस्तीत लागू असलेला तुकडाबंदी कायदा रद्द करण्या च्या मागणीला राज्याचे महसूल मंत्री चंद्रकात बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून १जानेवारी २०२५ पर्यत झालेले सर्व व्यवहार नियमित करण्याचे आश्वासन दिल्याने राज्यातील लाखो कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे.
राज्यात तुकडाबंदी कायद्यानूसार एक किंवा दोन गुंठ्यांचे व्यवहार केलेल्या नागरीकांना तुकडाबंदी कायद्याच्या बंधनामुळे घेतलेल्या जागेवर कोणतेही बांधकाम किंवा त्या जागांचे व्यवहार सुध्दा करता येत नव्हते या संदर्भात आ.अमोल खताळ यांनी लक्षवेधी द्वारे शासनाचे लक्ष वेधत तुकाडाबंदी कायद्याची अट रद्द करावी या महत्व पूर्ण मागणीवर उतर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील महानगरपालिका नगरपरिषद आणि नगर पंचायत क्षेत्राच्या हद्दीत व हद्दी लगत ज्या भागात तुकाडाबंदी कायद्याचे उल्लंघन झाले असेल त्या भागामध्ये १ जानेवारी २०२५पर्यत झालेल्या व्यवहाराकरीता नियम शिथिल करण्याचे जाहीर केले.
तसेच तुकडाबंदी कायद्याच्या संदर्भात राज्याचे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मुद्रांक आयुक्त आणि जमाबंदी आयुक्त आणि नगरविकास सचिव यांची समिती नेमून येत्या पंधरा दिवसात तुकडा बंदी बाबत निश्चित मार्गदर्शक प्रणाली तयार करण्याची घोषणा महसूलमंत्री बावनकुळे यांनी केली.
यासंदर्भात आ.अमोल खताळ यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच जलसंपदा तथा अहील्यानगर जिल्ह्याचे पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या प्रश्नाबाबत सातत्याने पाठ पुरावा सुरू ठेवला होता.सरकारने घेतले ल्या निर्णयाबद्दल आभार व्यक्त करून या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाला महा युती सरकारने दिलासा दिला असल्याची प्रतिक्रीया आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली
