सिन्नर तालुक्यातील गुळवंचमध्ये शिवशाहीर शरद महाराज ढवळे यांच्या कीर्तनाने उजळला संत बाळूमामा पालखी सोहळा – गावकरी ढवळे महाराजांना उचलून घेत नाचले !
गुळवंच (ता. सिन्नर) / लोकवेध live न्यूज
सद्गुरू संत बाळूमामा पालखी क्रमांक एक, मुक्या प्राण्यांच्या मेंढी पालखी सोहळा नुकताच गुळवंच (ता. सिन्नर) येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते शिवशाहीर शरद महाराज ढवळे यांचे हृदयस्पर्शी कीर्तन.
हजारो भाविकांच्या साक्षीने महाराजांचे कीर्तन सुरू झाले आणि क्षणात वातावरण भक्तिभावाने भारले. संत बाळूमामांच्या जीवनातील विविध प्रसंग, त्याग, सेवा आणि गुरुपरंपरेचे महात्म्य शरद महाराजांनी आपल्या गोड, ओघवत्या वाणीने उलगडून दाखवले. त्यांचे प्रत्येक शब्द हे भक्तांच्या हृदयात थेट घर करून गेले.
कीर्तन इतके प्रभावी झाले की चालू कीर्तनातच ग्रामस्थ व सेवेकरी मंडळींनी आनंदून महाराजांना उचलून घेत नृत्य केला. हा क्षण म्हणजे भक्तीचा उत्सव होता. संपूर्ण गुळवंच गावाने आणि पालखीतील मेंढके मंडळींनी शरद महाराजांना “गोरगरिबांचे देवदूत” म्हणत भरभरून प्रेम व्यक्त केले.
या सोहळ्यामुळे गुळवंच गावाला अध्यात्मिक उर्जा लाभली असून, संत बाळूमामांच्या पालखी सोहळ्याला आणि शिवशाहीर शरद महाराजांच्या कीर्तनाला आयुष्यभर विसरू न शकणारा एक सोनेरी अध्याय मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!