विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप – डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचा उपक्रम

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने सिद्धार्थ विद्यालय आणि वसतिगृहातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन, दप्तर आदी उपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन शिक्षण संघाचे अध्यक्ष बी.आर. कदम होते. प्रमुख उपस्थितीत एम.डी. सोनवणे, कुसुमताई माघाडे, अशोकराव दिवे, आर.एम. जगताप, विनय घोसाळे, सचिन साळवे, कैलास कासार, अॅड. अमित सोनवणे, डॉ. शशिकांत माघाडे यांचा समावेश होता.

कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य आर.एम. जगताप यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला. विशेष सत्कार म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे नवनिर्वाचित संगमनेर शहराध्यक्ष विनय घोसाळे यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश पारखे सर यांनी तर संयोजन सिद्धार्थ विद्यालय आणि सिद्धार्थ नाईट हायस्कूल यांच्या शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. विद्यार्थ्यांचा सहभाग आणि आनंद उत्स्फूर्त होता.

हा उपक्रम समाजातील दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हे ब्रीद अंगिकारत पुढील वाटचालीस बळ देणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!