रोहम वस्तीला अंधारातून प्रकाशाकडे नेणारे सरपंच! नारायण मरभळ यांच्या तात्काळ कार्यवाहीमुळे स्टेट लाईट पुन्हा कार्यान्वित

पिंपरणे / लोकवेध live न्यूज


संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावाच्या रोहम वस्तीमध्ये गेल्या महिन्यांपासून बंद असलेली स्टेट लाईट अखेर कार्यान्वित करण्यात आली असून, यामुळे ग्रामस्थांनी मोठा दिलासा अनुभवला आहे. विशेष म्हणजे या परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने अंधारामुळे ग्रामस्थांना भीतीच्या छायेत राहावे लागत होते.

शेतकरी, विद्यार्थी, महिला व वृद्ध या सर्वच नागरिकांना संध्याकाळनंतर घराबाहेर पडणे अत्यंत धोक्याचे बनले होते. पायी प्रवास करणाऱ्यांसाठी रस्त्यावरील अंधार जीवघेणा ठरत होता. अनेक दिवसांपासून लाईट बंद असल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात होता.

ही समस्या लक्षात घेत, ग्रामस्थांनी गावचे सरपंच नारायण मरभळ यांच्याकडे तातडीने स्टेट लाईट सुरु करून देण्याची मागणी केली. सरपंचांनी नागरिकांच्या मागणीची तात्काळ दखल घेत, संबंधित विभागाशी संपर्क साधून आवश्यक दुरुस्तीची कार्यवाही तातडीनं पूर्ण करून घेतली. रोहम वस्तीतील स्टेट लाईट पुन्हा कार्यान्वित करण्यात आली.

ग्रामस्थांनी सरपंच मरभळ यांचे मन:पूर्वक आभार मानत कौतुकाचा वर्षाव केला.
“सरपंचांनी वेळ न घालवता थेट कृती केली. त्यामुळे आता आम्हाला रात्री सुरक्षितपणे वावरता येते,” अशी भावना वस्तीतील महिलांनी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

या तात्काळ निर्णयक्षमतेमुळे सरपंच नारायण मरभळ यांचे नेतृत्व ग्रामपातळीवर प्रभावी ठरत असून, लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीची उत्कृष्ट उदाहरण म्हणून हे पाऊल अधोरेखित होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!