पिंपरणे-कोळवाडे विकासाचा नवीन पूलमार्ग : पुलास मंजुरीच्या उंबरठ्यावर, ग्रामस्थांत आनंदाची लाट!

पिंपरणे (ता. संगमनेर)  लोकवेध live न्यूज

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत पिंपरणे महादेव मंदिर ते पिरबाबा मंदिर (नागापूर वाडी ) दरम्यान प्रस्तावित पुलाच्या कामाला आता अधिकृत मंजुरी मिळण्याच्या अंतिम टप्प्यावर आहे. शनिवार, दिनांक १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंतिम फौंडेशन तपासणी यशस्वीरित्या पार पडली.

तपासणीसाठी ए.सी.आय. बँकेचे डेव्हलपमेंट अधिकारी विजय अंजनकर आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंता राहुल गायकवाड यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन सर्व तपशीलांची पाहणी केली.

या वेळी मंजाबापू साळवे, गोकुळ दिघे, स्वानंद चत्तर, भाऊराव देशमुख उत्तमनाना राहींज, संतोष बलसाने, कोंडाजी कडनर, सुरजीत खेमनर, संपत राक्षे, महादू गोंदे, सुरेश काळे, दिलीप वर्पे दत्तू तारडे, विश्वनाथ कौटे, सुधाकर कर्पे, गोरक्षनाथ कर्पे आणि कोळवाडे, पिंपरणे, नागापूर वाडी, घोडेझाप, राहींज वस्ती येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा पूल म्हणजे केवळ दळणवळणाचा सोपा मार्ग नव्हे, तर शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे आश्वासन आणि गावाच्या सौंदर्यात भर टाकणारा विकासदूत ठरणार आहे. सध्या या ठिकाणी असलेल्या केटीवेअरमुळे पावसाळ्यात पाणी साचून विद्यार्थ्यांना शाळेत येणे-जाणे कठीण होते, मात्र पुलामुळे ही समस्या कायमची मिटणार आहे.पिंपरणे-घोडेझाप-कोळवाडे या मार्गावर स्थायी आणि मजबूत दळणवळण उभे राहत असून राहींज वस्ती व परिसरातील ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन सुकर होणार आहे.संपूर्ण परिसरात सकारात्मक आणि उत्साहाचे वातावरण आहे.

“हा पूल म्हणजे भविष्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल – ग्रामविकासाच्या प्रवासातला मैलाचा दगड!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!