सत्याचा विजय! मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोषांना न्याय; ‘भगवा दहशतवाद’ ठरला फसवा आरोप!

हिंदू समाजाच्या अस्मितेवरचा डाग अखेर पुसला गेला… जे. पी. मिश्र आणि सहकाऱ्यांचा निर्णायक विजय!

मुंबई / लोकवेध live न्यूज

 

– मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल 17 वर्षांनंतर अखेर सत्याचा विजय झाला असून, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल श्रीकांत पुरोहित आणि इतर पाच जणांना विशेष न्यायालयाने निर्दोष घोषित केले आहे.

हा केवळ एक न्यायालयीन निर्णय नसून, एका संपूर्ण समाजावर लादलेल्या लांच्छनांचा, अपमानाचा आणि अन्यायाचा शेवट आहे. या निर्णयामागे वर्षानुवर्षांची वेदना, संघर्ष आणि मनस्वी लढा दडलेला आहे.

2008 मध्ये घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोटानंतर देशभरात हिंदू समाजावर ‘भगवा दहशतवाद’ असा आरोप लावण्यात आला. काँग्रेसचे तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘भगवा आतंकवाद’ अशी अपमानास्पद भाषा वापरली आणि त्यातून हिंदूंना हेतुपुरस्सर बदनाम करण्याचा प्रयत्न केला.

पुढे खुद्द शिंदे यांनीच हे विधान ‘राजकीय हेतूने’ दिल्याचं मान्य करत, हिंदू समाजाच्या अस्मितेवर केलेला हा घाव असल्याचं स्पष्ट झालं.

आज न्यायालयाच्या या निर्णयामुळे हे सर्व आरोपी पूर्णतः निर्दोष ठरले आहेत. हा निर्णय एकट्या व्यक्तींच्या न्यायाचाच नाही, तर हिंदू समाजावर लावण्यात आलेल्या कलंकावरचा पूर्णविराम आहे.

या लढ्यात न्याय मिळवून देण्यासाठी बोरिवलीचे सुपुत्र, प्रख्यात विधिज्ञ श्री. जे. पी. मिश्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे योगदान मोलाचे ठरले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे, अत्यंत क्लिष्ट, राजकीय हस्तक्षेपांनी गुंतवलेल्या या खटल्यात सत्याला उजाळा मिळाला.

विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गावाहिनी संयोजिका ॲड. सोनाली बोटवे यांनी मिश्र आणि त्यांच्या टीमचे विशेष अभिनंदन करताना, हा निर्णय संपूर्ण हिंदू समाजासाठी गौरवाचा क्षण असल्याचं सांगितलं.

हा निकाल आजच्या राजकारणालाही एक ठाम संदेश देतो – सत्तेसाठी समाजाला गद्दार ठरवणाऱ्या, जाती-पातीच्या नावाने फुट पाडणाऱ्या राजकीय खेळाडूंचा पराभव होतोच, उशिरा का होईना!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!