पिंपरणेकरांचा अटल भूजल योजनेत उत्स्फूर्तपणे सहभाग
संगमनेर लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे ग्रामस्थांनी अटल भूजल योजनेअंतर्गत होणाऱ्या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला असून तालुक्यात दहा गुणांसह आघाडीवर आहे
तालुक्यात भूजल उपशाचे प्रमाण अधिक आहे. यात फळबागायत, कृषी क्षेत्राकरिता होणारा उपसा देखील अधिक आहे. त्यामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याचे निदर्शनात येत आहे. या क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रे अतिशोषित, शोषित, अंशतः शोषित या वर्गवारीत समाविष्ट आहे. त्यासाठी पाणी पातळी वाढवण्याच्या दृष्टीने पिंपरणे गावाने भूजल स्पर्धेत भाग घेतला असून त्या दृष्टीने सध्या रिचार्ज ट्रेंज ( चर पुनर्भरण) हे काम चालू असून जवळपास दीडशे फूट लांब तीस फूट रुंद सहा फूट खोल या चाराचे काम चालू असून यामुळे जवळपासच्या विहिरींची पाणी पातळी वाढेल अशी आशा आहे यासाठी अटल भूजल योजनेचे वरिष्ठ भू वैज्ञानिक रश्मी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारण तज्ञ कानिफनाथ नाकाडे प्रीतम हासे यांनी भेट देऊन कामाबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी सरपंच नारायण मरबळ माजी सदस्य संजय बागुल संतोष वाकचौरे इंजिनिअर सचिन जोर्वेकर अण्णासाहेब वाकचौरे दीपक अभंग दत्तू वाघचौरे समता पवार, पवार सर नितीन बागुल सुरेश साळवे प्रदीप मांडे आदी उपस्थित होते
