राज्य उत्पादन शुल्क विभाग संगमनेर अधिकाऱ्यांनी संगनमताने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन गुन्हे दाखल करा
–अमर कतारी
महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समितीच्या वतीने संगमनेर येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक व इतर कर्मचारी, यांच्या विरोधात तक्रार दाखल
संगमनेर लोकवेध live न्यूज
संगमनेर व परिसरातील तालुक्यात बाबत काही विशिष्ट माहितीसाठी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे माहिती अधिकारात माहिती मागवली सदर माहिती मागणाऱ्या तक्रारदारावर संगमनेर निरीक्षक यांच्याकडून अनेक प्रकारचे दबाव टाकन्यात आले पक्षाच्या वरिष्ठ लोकांकडे माझी खोटी तक्रार करण्यात आली,अर्ज माघारी घेण्यासाठी विविध प्रलोभने देण्यात आली , म्हणून सदर माहितीत नेमकं काय दडलय हे बघण्याचा प्रयत्न मी केला, व राज्य उत्पादन शुल्क विभाग अहमदनगर या ठिकाणी वेळोवेळी पाठपुरावा करून सदर माहिती हातात घेतली संपूर्ण माहितीसाठी शासकीय रक्कम ७,२०० रुपये अदा केले तरीही मला संपूर्ण माहिती आजतागायात मिळाली नाही, मुदत संपून अनेक दिवस झाले माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे जेवढी माहिती मिळाली त्या माहितीचा अभ्यास केला असता संगमनेर अकोला व इतर परिसरात संगमनेर येथील अधिकाऱ्यांनी अनेक चुकीचे काम केल्याचे आढळले आहे, नवीन अनुज्ञप्ती परवाना देताना संपूर्ण कागदपत्रांची आवश्यकता असताना देखील लाखो रुपये लाच घेऊन अपूर्ण कागदपत्र असताना देखील अनेक नवीन बियर बार अनुज्ञप्ती यांना परवानग्या दिलेल्या आहेत तसेच अनुज्ञाप्ती, बियर बार परवाने रिन्यू करताना सुद्धा अनेक गोष्टी टाळल्या गेलेल्या ,परवाना स्थलांतरित करताना देखील शासनाचे अनेक नियम पायदळी तुडवलेले आहेत, म्हणून मी आपणास पुराव्यासह तक्रार करत आहे की आपण संबंधित जे कोणी अधिकारी व संगमनेर निरीक्षक त्यांच्यावर रितसर कारवाई करावी व त्यांना कायमचे बडतर्फ करून त्यांचे वर गुन्हा दाखल करावा व त्यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी सुद्धा करावी,माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीत अनेक नवीन अनुज्ञाप्ती देताना शासनाचे नियम पायदळी तुडवलेले आहेत ,रहिवासी क्षेत्रात परवाना देण्यात आलेला आहे ,तहसील येणे गुंठेवारी बिनशेती झालेल्या प्लॉटवर परवानगी देण्यात आलेली आहे, कोर्टात वाद सुरू असलेल्या जागेवर परवानगी देण्यात आलेली आहे, रस्त्याच्या मर्यादेच्या आत परवानगी देण्यात आलेल्या आहेत, शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार शाळा महाविद्यालय मंदिरे व इतर सार्वजनिक ठिकाणी यांच्यापासून ठराविक अंतरावर अनुज्ञप्ती परवाना देताना काही नियम दिलेले आहेत त्या नियमाना केराची टोपली दाखवलेली आहे परवाने स्थलांतरित करणे प्रकरणी देखील अनेक त्रुट्या आहेत, असे अनेक बेकायदेशीर काम पैसे घेऊन लाच घेऊन केलेली आहे, व भ्रष्टाचार केलेला आहे
एखादा सामाजिक कार्यकर्ता अवैध दारू विक्री बाबत जर तक्रार करत असेल तर संबंधित अधिकारी त्या गावातील अवैध दारू विक्री व्यावसायिकाशी हात मिळवणी करून त्या सामाजिक कार्यकर्त्याची बदनामी करतात किंवा त्याला मारहाण देखील करायला लावतात, संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात अवैधरित्या दारू विक्री सुरू आहे प्रत्येक छोट्या-मोठ्या दुकानांवर दुकानात वाल्यांकडून हजार रुपये, दोन हजार रुपये, पाच हजार रुपये, दहा हजार रुपये, व त्यापेक्षा जास्त हप्ता घेतला जातो, डुप्लिकेट व विदाऊट टीपीचा माल विकणाऱ्यांकडून देखील हप्ता घेतला जातो, हप्ते दिल्यामुळे डुप्लिकेट व विदाऊट टीपीचा माल दारू सर्रासपणे संगमनेर मध्ये विक्री सुरू आहे, संगमनेर तालुक्यातील अनेक ठिकाणावरून दारू सप्लाय केली जाते, दारू सप्लाय करणाऱ्या लायसन धारकांकडून देखील संबंधित अधिकारी लाखो रुपये हप्ते घेतात, व सदर दारू खेडी पाडे वाड्या वस्त्यांमध्ये पोहोचवली जाते, तसेच एक्सपायर झालेला माल दारू देखील हप्ता घेऊन विक्री करण्यासाठी संबंधित अधिकारी परवानगी देतात, अशीच काही दिवसापूर्वी एक तक्रार संगमनेर येथील हॉटेल लकी एफ एल 3 क्रमांक 96 यांच्यावर कारवाई करताना 1822 बिअर च्या बाटल्या मुदत संपलेल्या व पिण्यायोग्य नसलेल्या बाटल्यांची विक्री करताना ग्राहकाने तक्रार केल्यावर पकडून दिल्या सदर दुकानदारावर कोणतीही रीतसर कारवाई झालेली नाही कारवाई करताना देखील पंचनामा करताना देखील शब्दांची फेक जोक करून सदर बार मालकाला भविष्यात कसा फायदा होईल या पद्धतीचा पंचनामा केला जातो व तोडपाणी करून लाखो रुपये घेतले जातात म्हणून माझी संबंधित सर्वच अधिकाऱ्यांवर तक्रार आहे, आपण या दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावीव यांना कायमचे बडतर्फ करून यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करावी ही विनंती, महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समिती ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमर कतारी व जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब हासे, तालुकाध्यक्ष विकास डमाळे ,शहराध्यक्ष संभवलोढा ,पठार भाग ग्रामीण तालुकाध्यक्ष रंगनाथ फटांगरे ,व तालुका उपाध्यक्ष सचिन साळवे ,यांच्या वतीने करण्यात आलेली आहे
