संगमनेर मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीच्या महाविजयाचा आज महामेळावा
संगमनेर / लोकवेध live न्यूज
विधानसभा निवडणुकीत आ.अमोल खताळ यांच्या रुपाने महायुतीच्या महाविजयाच्या महामेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे महामेळाव्याच्या माध्यामातून कोणते राजकीय भाष्य करतात याची उत्सुकता आहे.

शहरातील जाणता राजा मैदानावर संपन्न होणार्या महामेळाव्याची जय्यत तयारी आ.अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला असून,भव्य मंडप उभारण्यात आला असून जिल्ह्यासह राज्यातील शिवसेनेचे आणि महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते या महामेळाव्यास उपस्थित राहून संबोधित करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील जनतेन आ.अमोल खताळ यांना विजयी करून प्रस्थापितांच्या विरोधात मोठे राजकीय परिवर्तन घडविले.यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तालुक्यातील जनतेचे आभार मानण्यासाठी येणार असून,पर्यटन मंत्री आणि जिल्ह्याचे संपर्क मंत्री शंभूराज देसाई पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील आ.विठ्ठलराव लंघे शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ चौधरी बाळासाहेब पवार शिवसेनेच्या नेत्या ज्योतीताई वाघमारे राजू वाघमारे शिवसेनेच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख अक्षय महाराज भोसले यांच्यासह महायुती मधील सर्व माजी आमदार खासदार घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष तालुका प्रमुख आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित राहाणार आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच संगमनेर तालुक्यात येणार असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे.दुपारी चार वाजचा एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांचे आगमन संगमनेर महाविद्यालयाच्या हेलीपॅडवर होणार आहे.पुणे नासिक महामार्गावर त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे.सर्व मार्गावर स्वागत कमानी तसेच महायुतीचे झेंडे लावण्यात आले आहेत.आ.खताळ यांच्या महायुती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
त्यानंतर जाणता राजा मैदानावरील सभा स्थळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार महायुतीच्या वतीने करण्यात येणार आहे.
सभेत एकनाथ शिंदे काय बोलाणार याची उत्सुकता असून विधानसभेला ऐतिहसिक विजय मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे वातावरण निर्माण होत असल्याने जिल्ह्यातील निवडणुकीच्या बाबतीत काय बोलणार याची उत्सुकता आहे.
महायुतीच्या महामेळाव्याच्या निमिताने आ.अमोल खताळ यांच्या उपस्थितीत गणेश नगर येथील सभागृहात महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली.उपमुख्यमंत्री एकनाथ यांच्या दौरा ऐतिहासिक होण्याच्या दृष्टीने सर्वानी योगदान देण्याचे आवाहन केले.महायुती सरकारच्या माध्यमातून तालुक्यात उपलब्ध झालेला निधी योजनांची यशस्वी अंमलबजावणी तसेच निळवंडे धरण आणि कालव्यांची काम भोजापूर धरणातून चाळीस वर्षानंतर मिळालेले पाणी देण्याच्या निर्णयाबद्दल महायुती सरकारने केलेल्या कामाची माहीती देतानाच आगामी काळात तालुक्यातील विकास कामांना गती देण्यासाठी महविजयी मेळावा महत्वपूर्ण असल्याचे आ.खताळ म्हणाले.
जाणता राजा मैदानावर सभा स्थळी आ.खताळ यांनी पाहाणी करून तयारीचा आढावा घेतला.सर्व तालुक्यातून येणारी वाहन लक्षात घेवून ठिकठिकाणी वाहनतळाचे नियोजन करण्यात आले आहे.
