ना.बाळासाहेब थोरात दूध उत्पादक संस्था निमगाव पागा संस्थेच्या वतीने दूध उत्पादक सभासदांना रिबेट व अनामत वाटप.

संगमनेर खुर्द / लोकवेध live न्यूज / संजय गोपाळे

दीपावलीच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथील ना. बाळासाहेब थोरात सह. दूध उत्पा. संस्थेच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना रिबेट, अनामत,तेल व साखरेचे वाटप करण्यात आले आहे .

दर वर्षाप्रमाणे याही वर्षी दीपावलीच्या निमित्ताने दूध उत्पादक शेतकऱ्यांना निमगाव बु. येथील ना.थोरात दूध संस्थेच्या वतीने सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना संस्थेच्या वतीने दुध अनामत -३रुपये ,दूध संस्था रिबेट-२ रुपये, दूध संघ रिबेट-१=३०पै. असे एकूण ६ रुपये=३० पैसे उत्पादकांच्या 93,46,521/खात्यात वर्ग करण्यात आले आहे.
तसेच दूध उत्पादकांसाठी तेल डब्बा, साखर वाटप संस्थेचे संस्थापक चेअरमन ॲड. माधवराव कानवडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे.
याप्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन विलास दादा कानवडे, संस्थेचे सचिव दादाभाऊ फरगडे सर्व संचालक,कर्मचारी मंडळाच्या उपस्थितीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.
सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांची दीपावली गोड व्हावी यासाठी दरवर्षी सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला असून, ना. थोरात दुधसंस्थेच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव देण्याचे काम संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्व दूध उत्पादक सभासदांना ही दिपावाली सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जावो अशी शुभेच्छा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, तथा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन ॲड. माधवराव कानवडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!