सुगम गीतगायनात चमकले मदने सर : विभागीय स्तरासाठी निवड
संगमनेर
येथील जि.प. प्राथमिक शाळेचे उपाध्यापक श्री. सोमनाथजी मदने सर यांनी जिल्हास्तरीय शिक्षक व अधिकारी स्पर्धेत सुगम गीत गायन प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत उत्तुंग यशाची नोंद केली आहे. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाची दखल घेत त्यांची विभागीय स्तरासाठी निवड झाली असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
या स्पर्धेत अनेक दर्जेदार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असतानाच मदने सरांनी आपल्या सुरेल आवाज, तालज्ञान आणि भावपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकली. शिक्षक म्हणून शालेय कामकाजासोबतच कलाक्षेत्र जपण्याची त्यांची आवड व सातत्यपूर्ण मेहनत यामुळेच हे यश त्यांच्या वाट्याला आल्याचे मत सहकाऱ्यांनी व्यक्त केले.
मदने सरांच्या या यशामुळे शाळा परिवार, गावकरी, पालकवर्ग आणि शिक्षण विभागात आनंदाचे वातावरण आहे. विभागीय पातळीवरील स्पर्धेतही ते आपले कौशल्य प्रभावीपणे सादर करून आणखी मोठे यश मिळवतील, असा विश्वास मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकवर्गाने व्यक्त केला आहे.
श्री. सोमनाथजी मदने सर यांना हार्दिक अभिनंदन व आगामी स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
