रविवारी रहाणे हॉस्पिटल व रहाणे मेडिकलचे भव्य उद्घाटन

संगमनेर

संगमनेर शहरातील रुग्णसेवेला आधुनिक वैद्यकीय सुविधांची नवी दिशा देणाऱ्या *रहाणे हॉस्पिटल व रहाणे मेडिकल (लॅप्रोस्कॉपी, वंधत्व उपचार, मातृत्वसेवा व 3D सोनोग्राफी)* यांचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार दि. २५ जानेवारी २०२६ रोजी सायं. ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा रहाणे हॉस्पिटल, जुने डॉ. श्रीकांत देशमुख हॉस्पिटल, शिवाजीनगर, संगमनेर येथे होणार आहे.


या हॉस्पिटलमध्ये सुलभ व सुरक्षित सिझेरियन प्रसूती, अत्याधुनिक लॅप्रोस्कोपिक (दुर्बिणीद्वारे) शस्त्रक्रिया, वंधत्व निवारण उपचार, तसेच थ्री-डी सोनोग्राफीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वंधत्व निवारणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी आधुनिक तंत्रज्ञानाधारित साधने येथे वापरण्यात येणार असून, जर्मन कंपनीच्या अत्याधुनिक उपकरणांद्वारे गर्भपिशवी काढणे, गाठ काढणे, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन तसेच ऑपरेशन उलटवणे यांसारख्या सेवा रुग्णांना मिळणार आहेत.
या भव्य उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने (जगप्रसिद्ध नेत्रशल्यचिकित्सक) तसेच डॉ. नितीन घोरपडे (जगप्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन) यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, धार्मिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांसह नातलग मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. तुषार लक्ष्मण रहाणे (MBBS, MS OBGY, DNB, FRM, FMAS – अ‍ॅडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जन व IVF स्पेशालिस्ट) आणि डॉ. सौ. वृषाली तुषार रहाणे (MBBS, MD अ‍ॅनेस्थेसिया) हे रुग्णांना तज्ज्ञ व विश्वासार्ह वैद्यकीय सेवा देणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गं.भा. मंगल लक्ष्मण रहाणे, डॉ. तुषार लक्ष्मण रहाणे, श्री. पांडुरंग बबन रहाणे, श्री. गौरव लक्ष्मण रहाणे (M.Pharmacy), श्री. रामनाथ बबन रहाणे व सौ. डॉ. सोनाली गौरव रहाणे (M.Pharmacy, Ph.D.) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!