प्रजासत्ताक दिनानिमित्त अकोलकर सरांकडून टाकळी शाळेस ९ हजारांची डिजिटल फ्लेक्स कमान भेट
अभूतपूर्व उत्साहात लोकार्पण सोहळा संपन्न**
अकोले प्रतिनिधी

दि. २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी टाकळी केंद्रशाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी व माध्यमिक विद्यालय टाकळीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारित संगीत कवायतीचे नेत्रदीपक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच भारतीय संविधानाची उद्देशिका, बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा, साक्षरता अभियान व टी.बी. मुक्त भारत या विषयांवर शिक्षकवृंदांनी सामूहिक प्रतिज्ञांचे वाचन घेतले. विद्यार्थ्यांची भाषणे, देशभक्तीपर समूहगीते व सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.
या राष्ट्रीय कार्यक्रमाचे औचित्य साधून टाकळी गावचे सुपुत्र व सध्या श्रीरामपूर येथे स्थायिक असलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक मा. श्री. नवनाथ अकोलकर यांनी आपल्या आपुलकीच्या मिशन अंतर्गत पिताश्री कै. सखाहरी फकिरबा पा. अकोलकर यांच्या स्मरणार्थ टाकळी शाळेस सुमारे ९,०००/- रुपये किंमतीची स्टार डिजिटल फ्लेक्स कमान भेट देत सामाजिक बांधिलकी जपली. या प्रसंगी नवनाथ अकोलकर व त्यांचे बंधू दादा पाटील अकोलकर यांचा टाकळी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
याचबरोबर सेवाभावी व शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्त्व दादा पाटील तिकांडे, रामहरी तिकांडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष निलेश भरीतकर यांचाही शालेय विकासकामांतील विशेष योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. आदर्श ग्रामपंचायत टाकळी तर्फे सर्व विद्यार्थ्यांना १० किलो चॉकलेटचा खाऊ वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमास मेजर भाऊसाहेब दिघे, अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, विठे आरोग्य केंद्राचे डॉ. मोरे, सरपंच दत्तु भाऊ गरूड, पोलीस पाटील रामदास तिकांडे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब फोडसे, पोपटराव शेवाळे, संतोष तिकांडे, डॉ. जनार्दन मोरे, दत्ताराम दातखिळे, डॉ. उज्ज्वला वैद्य, ग्रामविकास अधिकारी हासे, संतोष नाईकवाडी, नामदेव गाडे, विजय दातखिळे, शिवाजी तिकांडे, सागर तिकांडे, शोभा भरीतकर, विद्या तिकांडे व अंजुम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. श्रीनिवास पोतदार, दत्तात्रय देवगिरे, संजय देशमुख, कैलास झोळेकर, श्रीकांत मेंगाळ, संगिता धिंदळे, शुभांगी साबळे, कल्पना पवार, नीता लेंभे व आल्हाट मामा यांनी विशेष परिश्रम घेतले. टाकळी शाळेसाठी लोकसहभागातून मदत करणाऱ्या दात्यांचे व शिक्षकांचे अकोले तालुका गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, बीट देवठाण शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड व केंद्रप्रमुख रोहिणी खतोडे यांनी कौतुक व अभिनंदन केले.
