*थोर स्वातंत्र्य सेनानी मा.आ.कॉ.पी .बी. कडू पाटील व मातोश्री शांताबाई कडू पाटील स्मृतिदिन सोहळा संपन्न.*

निमगाव जाळी / अशोक गोसावी

रयत शिक्षण संस्थेच्या,रयत संकुल व कॉ.पी.बी.कडू पाटील फाउंडेशन,सात्रळ यांचे संयुक्त विद्यमाने रयत संकुल सात्रळ ता.राहुरी येथे थोर स्वातंत्र्य सेनानी मा.आ.कॉ. पी.बी.कडू पाटील व मातोश्री शांताबाई कडू पाटील स्मृतिदिन सोहळा व शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा व पारितोषिक वितरण समारंभ आज रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, अभिनव शिक्षण संस्था,अकोलेचे अध्यक्ष मधुकर नवले साहेब व मा. खासदार प्रसादराव तनपुरे,अर्जुनराव राजळे यांचे शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.थोर स्वातंत्र्य सेनानी, मा.आ.कॉ पी. बी. कडू पाटील व मातोश्री शांताबाई कडू पाटील , कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्रास्ताविक व स्वागत करताना स्कूल कमिटी सदस्य किरण कडू पाटील म्हणाले की थोर स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार कॉ पी बी कडू पाटील, मातोश्री शांताबाई कडू पाटील यांच्या कार्याचा गौरव व स्मरण करण्यासाठी त्यांचा स्मृतिदिन सोहळा साजरा केला जातो. त्यानिमित्ताने शैक्षणिक , सामाजिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा सत्कार शाल व बुके, सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. उद्योजक अशोकराव खटके साहेब, मा. प्राचार्य गहिनीनाथ विखे पाटील, ॲड.राधाकिसन पुलाटे साहेब, रयत शिक्षण संस्थेचे मा. सचिव शिवाजीराव भोर साहेब, भाऊसाहेब पेटकर सर,यांचाही सत्कार करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी विषद केली.कमुनिस्ट पक्षाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होत आहे ते निमित्त लक्षात घेऊन सर्व कम्युनिस्ट मान्यवरांचा, आप्पांच्या सहकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचे ठरविण्यात आले आजच्या देशाच्या जडणघडणीत त्यांचा कसा सहभाग आहे हे सांगून ती विचारसरणी आजही कशी गरजेची आहे याविषयी उदाहरणे व प्रसंग सांगून कम्युनिस्ट विचारसरणीवर प्रकाश टाकला.कॉ.पी. बी .कडू पाटील सन्मान सोहळ्याचे सर्व सन्मानार्थी कॉ.गंगाधर पाटील जाधव, कॉ.कारभारी उगले,कॉ. भगवान गागरे,कॉ. एल . एम डांगे, नामदेवराव दिघे, बबनराव कडू पाटील सखाराम गुजाबा अंत्रे, मारुती महादू अनाप , प्रभाकर गोविंद पलघडमल कॉ. बाबा आरगडे कॉ. लक्ष्मणराव नवले, कॉ. पांडुरंग शिंदे, डी एस वडजे बापू, शांतीभाऊ गांधी, संभाजीराव चोरमुंगे, कुशीनाथ गोपाळा अंत्रे, अहमद हसन शेख,कॉ. कृष्णा पवार कॉ. नारायण गायकवाड , कॉ. बादशाह भाई, गुलाबराव आहेर गुरुजी, डॉ.के.के.बोरा, भाऊसाहेब मुरलीधर कडू, माधवराव बाळाजी शिरसाठ, नारायणराव मुसमाडे पाटील यांचा शाल, हार,बुके व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मातोश्री शांताबाई कडू पाटील आदर्श मुख्याध्यापिका म्हणून श्रीमती सुमनताई अशोकराव ताकटे व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती भागीरथीबाई बाबुराव थोरात यांचाही शाल , बुके, व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.कॉ पी.बी.कडू पा. यांचे जीवन व कार्य याविषयी निबंध, व वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह, व प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.यानंतर अशोक भुसारी, जाधव साहेब, सुहास टेकाळे, अशोकराव खटके यांनी कडू पाटील फाउंडेशनला देणगी दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली .कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसादराव तनपुरे साहेब म्हणाले की , ऋषितुल्य व्यक्तींचा सन्मान करण्याचे भाग्य लाभल्याने आनंद व्यक्त केला आप्पा एक सुसंस्कृत,
समाजकारणी कसे होते निष्काम काम करत वैचारिक जपवणूक कशी केली व चारित्र्यावर डाग न लागता विरोधकाचाही सन्मान करून कार्यकर्त्याची फळी कशी तयार केली.आप्पांचे विचार आजही जपले जातात याविषयी समाधान व्यक्त करून त्यांच्या कार्यात शांताबाई कडू पाटील यांचाही मोठा वाटा आहे हे स्पष्ट केले उपस्थित मान्यवरांचा सन्मान केल्याबद्दल अरुण कडू पाटील यांचे अभिनंदन केले सुरेश भट यांच्या उषःकाल होता होता कवितेच्या ओळी आठवून आयुष्याच्या पेटवा मशाली असे आवाहन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर नवले साहेब म्हणाले की, मानवी जीवनात कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली त्याचा आनंद व अभिमान व्यक्त केला कम्युनिस्ट चळवळीविषयी अभिमान आजही असुन अकोले तालुक्यात आप्पांची प्रतिमा जननायक म्हणून आहे सहकारात यायचे असेल तर देण्यासाठी यायचे असे आप्पा सांगत. स्वातंत्र्याच्या चळवळीत येऊन त्यांनी. कष्टकरी व कामगारांच्या समस्या सोडविल्या, न्याय मिळवून दिला. स्वावलंबन व स्वाभिमान जपला तरच देश खऱ्या अर्थाने विकसित होईल, आप्पाचा स्मृतिदिनाचा हा आदर्श व वारसा यापुढेही असाच चालू ठेवावा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील ,ॲड.विजयराव कडू पाटील,पंकज कडू पाटील, किरण कडू पाटील, विक्रम कडू पाटील,योगेशचोरमुंगे ,अनिल शेठ लोढा , सौ . शोभाताई कडू पाटील, सौ सुरेखा कडू पाटील, सौ निकिता कडू पाटील, रयत संकुलाचे प्राचार्य सिताराम गारुडकर, मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे, पर्यवेक्षिका हेमलता साबळे, ज्युनि.कॉलेज विभागप्रमुख विलास दिघे, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, कार्यकर्ते, पत्रकार बंधू, शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास तांबे , सचिन पलघडमल , यांनी तर आभार मा.प्राचार्य गहिनीनाथ विखे सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!