पेमगिरी येथे 30 फूट हनुमान गदेचे गुरुवारी लोकार्पन
आ थोरात , आ. सत्यजित तांबे , अभिनेता देवदत्त नागे ,आमदार लहामटे यांची उपस्थिती
संगमनेर लोकवेध live न्यूज

ऐतिहासिक शहागडाच्या पायथ्याशी असलेल्या पेमगिरी येथे भारतातील सर्वात उंच मारुतीरायांच्या ३० फूट गदेचा लोकार्पण सोहळा हनुमान जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक ६ एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 वा. पेमगिरी येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार डॉ किरण लहामटे अभिनेता देवदत्त नागे, प्रा नामदेवराव जाधव यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सोमनाथ गोडसे यांनी दिली आहे.
पेमगिरी येथील 30 फूट गदेच्या लोकार्पण बाबत माहिती देताना गोडसे म्हणाले की, पेमगिरी हे संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक गावातून शहागड व भारतातील सर्वात मोठा वटवृक्ष या गावात आहे याचबरोबर आता नव्याने भारतातील सर्वात उंच मारुती रायांची 30 फूट गदा या ठिकाणी उभारली आहे. हनुमान जयंती निमित्त या ऐतिहासिक 30 फुटी गदेचा लोकार्पण काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे, आमदार किरण लहामटे, सिने अभिनेता देवदत्त नागे, इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. नामदेवराव जाधव यांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे. याप्रसंगी डॉ प्रसाद रसाळ ,अजित पाटील, राजेंद्र जाधव व छत्रपती युवा प्रतिष्ठान कळस यांना गौरवण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, ॲड. माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, राजेश मालपाणी, मिलिंद कानवडे, बाळासाहेब देशमाने , पांडुरंग घुले यांसह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील व पंचक्रोशीतील नागरिक युवक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आव्हान पेमगिरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे

ऐतिहासिक शहागड, नैसर्गिक महावड, मोरदरा धरण, पुरातन बारव, भव्य हनुमान मंदिर व आता हनुमान गदेमुळे पेमगिरीच्या पर्यटन वैभवात मोठी भर पडणार आहे. निसर्गाने मुक्तहस्तपणे उधळण केलेल्या पेमगिरीला गतवैभव मिळवून देण्यासाठी गावचे भूमिपुत्र असलेले पुण्यातील प्रतिथयश उद्योजक रोहित डुबे यांच्या प्रयत्नांतून व नवनवीन संकल्पनेतुन तसेच गावकऱ्यांच्या सहकार्याने स्वराज्य संकल्पभूमी पेमगिरीचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे रेखाटले जाणार आहे