झोळे गावात ३०० वर्षां पूर्वीचा पाहुणा मारूती
 हनुमान जयंती निमित्ताने होणार विविध धार्मिक कार्यक्रम
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
संगमनेर तालुक्यातील झोळे गावात ३०० वर्षे पुर्वीची मारुतीची मुर्ती आहे. ही मुर्ती ६ फुट उंच असून पुर्ण दगडाच्या पाषाणात कोरलेली आहे. असे सांगीतले जाते की झोळे येथे मोठे वडाचे झाड होते. या वडाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी बैल गाड्या आल्या असता त्यावेळी एका बैल गाडी मारूतीची मुर्ती होती त्या ठिकाणी मुर्ती बैल गाडीत नेत असताना बैल गाडीचे चाक मोडले म्हणून मुर्ती घेऊन जाणारे मंडळींनी मुर्ती तशीत वडाच्या झालाखाली ठेवली गाडीच चाक व्यवस्थित केल्यानंतर ती मुर्ती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मुर्ती जागची हालली नाही, असे जानकार सांगतात.. आजही ही मुर्ती आहे तशी गावात असून तेव्हापासून
आजपर्यंत हनुमान जयंतीला विविध धार्मिक कार्यक्रम येथे होत असतात. म्हणून आज हनुमान जयंतीनिमित्ताने
विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. गावातील महादेव मंदिराशेजारीच असलेले वडाच झाड आहे. याच झाडाखाली ही हनुमानाची मुर्ती आहे. १९९० साली झालेल्या वादळात वडाचे झाड पडले. यामुळे हनुमानाची मुर्ती उघडयावर पडली. अनेक वर्ष ऊन, वारा, पाऊसामध्ये ही मुर्ती आजही अबाधित आहे. यानंतर गावातील तरुणांनी एकत्र येवून मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आणि सन २०१३ ला मंदिराचे बांधकाम पुर्ण केले. या कामी विजय हारदे यांनी मोलाच सहकार्य केले. तसेच परीसरातील ग्रामस्थ भाविकानी तन मन धनाने मदत केली..
या कामाला हळूहळू सुरुवात झाली. आज या ठिकाणी भव्य असे मंदिर उभारून त्या ठिकाणी या हनुमान मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. त्यानंतर दरवर्षी हनुमान जयंतीला भव्य कार्यक्रम होत असतो. यासाठी गावातील लोक अन्नदानाचा कार्यक्रमही करत असतात. यासाठी बांधकाम व्यावसाईक विजय हारदे स्वतः भव्य महाप्रसादाचे आयोजन करतात..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!