साईबाबांवरील विधान भोवले! बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी अखेर मागितली माफी, म्हणाले…
  धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी माफी मागितली आहे. बागेश्वर धामच्या ट्विटर अकाउंटवर बाबांनी याबाबत ट्विट केलं आहे. 
 लोकवेध live न्यूज :
बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांवरून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. यानंतर बागेश्वर बागेश्वर बाबा यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा यांनाच देव मानण्यास नकार दिला. साई बाबा यांच्यासंदर्भात केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला. यानंतर आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी माफी मागितली आहे. बागेश्वर धामच्या ट्विटर अकाउंटवर बाबांनी याबाबत ट्विट केलं आहे.
“संत आणि महापुरुषांबद्दल मला नेहमीच आदर राहिला आहे. आपल्या मागे छत्री ठेवून आपण शंकराचार्य आहोत असे म्हटले तर कसे होईल? आमच्या शंकराचार्यांनी जे म्हटलं त्याच गोष्टीचा आम्ही पुनरुच्चार केला की साईबाबा संत, फकीर असू शकतात. त्यांच्याप्रती लोकांची आस्था आहे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. कोणी संत गुरुंना देव मानत असेल तर ती त्याची वैयक्तिक आस्था आणि भावना आहे. आमचा त्याला अजिबात विरोध नाही. आमच्या कोणत्या शब्दाने कुणाचं मन दुखावलं असेल तर त्याचे आम्हाला मनापासून दुःख होत असून खेद वाटत आहे” असं बागेश्वर बाबा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ज्यांची साईबाबांवर श्रद्धा आहे, त्यांच्या श्रद्धेला मी दुखावू इच्छित नाही. कोणतेही संत असू द्या, मग गोस्वामी तुलसीदास असो, सूरदास असो हे सर्व संत आहेत. काही महापुरुष आहेत. काही युगपुरुष आहेत. काही कल्प पुरुष आहेत. परंतु यात कोणीही देव नाही, असेही बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!