गोड वाटणारा खोटे बोलतो तोच खराशत्रू -राठी
जाखुरीत गगनगिरी महाराज सप्ताहात शिवपुराण कथा पुष्प पाचवे
संगमनेर / लोकवेध live न्यूज
जो कोणी गोड बोलणारा असतो तोच खोटे बोलत असतो आणि ते त्याचे खोटे बोलणे त्याच्या दृष्टीने हानिकारक आहे त्यामुळे नेहमी खरे बोलत जा कधी ही खोटे बोलू नका खोटे बोलणारच खरा आपला शत्रू असल्याचे नाशिक येथील शिवपुराण कथाकार माधवदास महाराज राठी यांनी सांगितले
संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह शिवपुराण कथेचे चौथे पुष्प गुंफ ताना माधवदास महाराज राठी बोलत होते यावेळी गगनगिरी महाराजांचे पुतणे बापूसाहेब पाटणकर नातू रामराव पाटण कर तान्हा जीराव पाटणकर राजेंद्र पाटणकर त्रिंबकेश्वर येथील श्रीपाद महाराज कुलकर्णी खा सदाशिव लोखंडे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पत्नी कांचनताई थोरात प्रमोद राहणे किसन शिंदे नानासाहेब शिंदे रामभाऊ राहणे सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे संजय महाराज देशमुख बाळू महाराज रवीगिरी महाराज आबासाहेब थोरात कपिल पवार पृथ्वीराज थोरात बाळासाहेब ताजने दादाभाऊ वर्पे पोपट येवले बाळासाहेब देशमुख राजेंद्र देशमुख किसनराव पानसरे नितीन पानसरे पोपट आगलावे कारभारी रहणे भास्कर बागुल पंडितराव देशमुख दशरथराव देशमुख रमेश खैरे आदी मान्यवर उपस्थित होते
राठी महाराज म्हणाले की शत्रूंना ही बोलणे कडू असते ते ऐकताना दुःख होते पण परिणामी सुखकारक असतं ज्यांना आपलं हित व्हावं असं वाटत असेल तर ते हितचिंतक असतात तेच असे बोलतात आणि काही बोलणार्यांचे बोलणे हेअमृता सारखे असतात त्यांचा परिणाम ही आनं ददायी असतो सत्य हा त्यांचा बोलण्याचा आधार असतो त्यांच्याजवळ ज्ञान संपत्ती आहे त्यांना लौकिकाची आवश्यकतानाही उलट त्यांच्या कृपेने ऐशवर्य सुख समृद्धी प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले
पत्नीने आपले हातातली सर्व काम बाजूला टाकावीत आणि अगोदर त्यांची पती परमेश्वर आहे असे मानून त्याचीसेवा अगोदर करावी निरर्थक गप्पा करत बसू नये आपल्या पतीच्या संमतीशिवाय आप ल्या घरात कोणत्या गोष्टीची उणीव अगर कमतरता असेल तर ते सगळीकडे उघडे करून सांगू नये याचे कुणाचेही इकडे तिकडे चुभल्या करू नका कोणाच्याही संसाराचं वाटोळ होईल किंवा भेद निर्माण होईल भांडण निर्माण होईलअसे कधीही वागू नक असा ही सल्ला त्यांनी दिला
एखादी मुलगी सासरी येताना तिच्या आवडी निवडी,अशा अपेक्षा नाते गोते व कुळ असे सर्व संबंध सोडते आणि आप ल्या होणाऱ्या पतीच्या विश्वासावरआणि भरवश्यावर येते आणि त्याच्या आवडी निवडी त्याच्या नातेवाईकांशी आपला संबंध जोडून घेते केवळ त्याच्या वरचा विश्वास व भरवसावर तिचे सर्व सोडून येत असते मात्र दुर्दैवाने आम्ही सर्व काही विसरून जातो आणि म्हणून घटस्फोटा सारख्या घटना वारंवार घडत असल्याचे त्यांनी सांगितले
स्त्रिया उत्तम मध्यम आदम व निकृष्ट
अशा चार प्रकारच्या असतात परपुरुषा कडे शुद्ध बुद्धीने पिता बंधू पुत्र याप्रमाणे बघा आणि स्वप्नातही परपुरुषाचा विचार कधीच करू नका असा ही सल्ला देत ते म्हणाले की सर्व बंधने तोडता येतात मात्र स्त्रीसंग सोडता येत नाही लोखंडची बेडी तोडता येईल परंतु पत्नी मुले संसाराची बेडी तोडता येत नाही जेव्हा भक्तावरती संकटे येतात तेव्हा भगवान परमार्थ त्या भक्तांच्या मदतीला धावून येत असल्याचे त्यांनी सांगितले
आशा अपेक्षा आमच्या व्यवहारिक जीवनात किती असाव्यात याला काही मर्यादा आहे दोन-तीन वर्ष होत नाही तर लागलीच आई-वडिलांना मूल होण्याची अपेक्षा असते कुलदेवतेची प्रसन्नता प्राप्त करा आपल्या इतरांची प्रसन्नता प्राप्त करा त्यांची कृपा मिळवा आई-वडिलांची वडीलधाऱ्यांची सेवा करा अपेक्षा केली की भगवंत उपेक्षा करतो देवाकडे जो मागतो त्याला भगवंत कधीच देत नाही मात्र देव तुम्हाला न मागता तो देतो ते मागण्याची तुम्हाला गरज नाही आपली काय पात्रता आहे काय योग्यता ही आप ल्यापेक्षा त्याला जास्त माहिती अधिकार असतो विचाराने पुढे जाण्याचा विचार करा अधीर लोकांचा गैरफायदा समाजात घेण्याकरता बरेच जण टपून बसलेलेआहे या सगळ्याचा विचार करा आपल्यातील सगळे विकार जोपर्यंत आपण आपल्या ताब्यात घेत नाहीत जो पर्यंत मानसिक स्वास्थ्य नाही तोपर्यंत शारीरिक स्वास्थ आणि त्याकरता वैचारिक आणि व्यवहा रिक शुद्धता जीवनात आवश्यक अस ल्याचे त्यांनी सांगितले
ओझर गावाने १०५ साखर पोते ५० तेलाचे डबे दिलेसंगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द गावाला गगनगिरी महाराज सप्ताहसाठी साखर देण्याचे आवाहन केले त्या आवा हनाला प्रतिसाद देत ओझर खुर्द येथील ग्रामस्थांनी व गगनगिरी भक्तांनी अवघ्या दोन तासात कंबर पोते साखर देण्याचे मान्य केले आणि गगनगिरी महाराजांचा जयजयकार करत वाजत गाजत घेऊन आले तसेच संगमनेर तालुक्यातील वाघापूर येथील ग्रामस्थांनी एकत्रित येत 50 जमिनीचे तेल सप्ताह देण्यात आले
