वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव मार्गी लावू – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

संगमनेर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना एकाच पदावर बारा वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते वरिष्ठ वेतनश्रेणी साठी पात्र होतात. एकाच पदावर चोवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते निवड श्रेणीसाठी पात्र होतात. नवीन परिपत्रकानुसार ते अधिकार गट विकास अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे.संगमनेर शिक्षण विभागाकडून ते प्रस्ताव त्वरित मंजुरीसाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड यांनी संगमनेर तालुका प्राथमिक शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
नुकतीच शिक्षक परिषदेचे जिल्हा उच्च अधिकार समितीचे जिल्हा अध्यक्ष आर. पी. राहणे यांनी संगमनेर तालुका शिक्षक परिषदेचे पदाधिकारी यांच्या समवेत गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. पूर्वी वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव जिल्हा परिषदेचे पाठवले जात असे. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर प्रस्ताव मंजुरीचे अधिकार गट विकास अधिकारी यांना दिल्याने असे सर्व प्रस्ताव तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांच्याकडे मंजुरीस जाणार असल्याने लवकर मंजूर होतील. आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यात येईल. असे ते म्हणाले.
यावेळी संगमनेर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे वैद्यकीय बिले, दुय्यम सेवा पुस्तके अद्यावत करणे, संगमनेर तालुक्याचा मागील महागाई भत्ता फरक लवकर मिळावा. या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड यांनी लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुवर्णाताई फटांगरे,अशोक गोसावी , राजेंद्र भालारे व रामनाथ साबळे उपस्थित होते. शिक्षक परिषदेचे अशोक गिरी, तालुकाध्यक्ष सोमनाथ घुले,गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष संतोष भोर, उच्च आधिकारचे भाऊसाहेब एरंडे,संजय आंबरे, बाळू गुंजाळ,सत्यवान गडगे,गवनाथ बोराडे व नंदू कुडेकर शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!