अहंकार सर्वनाशाचे मूळ आहे :- इंदुरीकर
स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहची कल्याच्या किर्तनाने सांगता
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याचकडे प्रेम आणि आपुलकी व दया कमी होते आणि त्यातून अहंकार वाढतो आणि अहं कार वाढला की त्याचा सर्वनाश झाल्या शिवाय राहत नसल्याचे परखड मत महा राष्ट्रातील थोर समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशुमुख इंदोरीकर यांनी व्यक्त केले
संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे सुरू असणाऱ्या गगनगिरी महाराज अखंडहरि नाम सप्ताहाची सांगता समाज प्रबोधन कार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली त्या वेळी आयोजित किर्तनात ते बोलत होते यावेळी ठाणापती विष्णुपरी महाराज शंकरानंदगिरी महाराज सरदार संजय पाटणकर, शिवजीराव पाटणकर, चंद्रकांत पाटणकर ,रोहित पाटणकर, शनीदेव महाराज खा. डॉ. सुजय विखे आ सत्यजित तांबे,, माजी.खा. भाऊसाहेब वाकचौरे रणजित देशमुख जालिंदर वाकचौरे, डॉ जयश्री थोरात, अजय फटांगरे, प्रवेक्षधिन पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, कपिल पवार अशोक कानवडे, नानासाहेब दिघे, रामहारी कातोरे सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे उपाध्यक्ष संजयगिरी महाराज देशमुख बाळासाहेब ताजने सागर वाकळे किरण घोटेकर सुभाष राहणे सागर वाकचौरे प्रमोद देशमुख बाळासाहेब देशमुख किसन पानसरे नितीन पानसरे राजेंद्र देशमुख राजेंद्र पानसरे कारभारी राहणे अजित देशमुख आदि उपस्थित होते.
इंदुरिकर महाराज म्हणाले की वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वर आहे, कळस संत तुकाराम महाराज आहे इमा रत संत नामदेव आहे. तर भिंत एकनाथ महाराज आहे. एवढे महत्त्व वारकरी संप्र दायात संतांना आहे परमपूज्य स्वामी गग नगिरी महाराज सप्ताह हा देवाची विभूती आहे. त्यामुळे या सप्त्यात तुम्ही जेवढे पुण्य कराल तेवढे पुण्य इतर कुठे मिळणार नाही पुस्तकी ज्ञानाचा उपयोग फक्त संसरासाठी होतो.तुम्ही किती ही शिका, तुम्ही अज्ञानी असेल तर तुम्ही कुणाचेही गुलामच व्हाल असे त्यांनी सांगितले
आपल्याला कुठलेच ज्ञान नाही. आपण स्वतःला ज्ञानी समजतो, अक्कलशिकवते मंदिरावर कळस चढाला की मंदिर पूर्ण होते, पण सागराला मिळाले तर नदी पूर्ण होईल अठरा अध्याय ज्ञानेशवरीचाकळस आहे आठरावा अध्याय वाचला की ज्ञाने श्वरी वाचली असे होते.अष्टांग योगशिकले तरी देव भेटणार नाही मात्र सर्वसमाश्यांचे मूळ आणि तुमचे कोणतेही प्रश्न असो त्या सर्वांचे उत्तर हरिपाठामध्ये आहे. हरिपाठ केला तर त्यातून तुम्हाला देव भेटेल. त्या साठी देवाचे कायम नामस्मरण करा दान धर्म करा दानधर्म करायला पैसा घामाचा असावा लागतो, तो हरामचा नसावा. पण गगनगिरी महाराजांचा सप्ताहाचा काला संपल्यानंतर पाऊस आल्याशिवाय राहणार नाही. संसार नावाचे झाड वांझआहे. त्याला अज्ञान झाले तर अहंकार होतो, मी हे केले ते केले असे कधीच सांगू नका तू तर काहीच केले नाही तर तुमच्याकडून हे काम देवाने करून घेतले असल्याचेत्यांनी ज्ञान आहे हा सप्ताह जाखुरीकरांनी केला असे नाही तर हे काम गगनगिरी महाराज यांनी करून घेतले सप्ताहात कौतुक करू नका सर्वात पाहिले कौतुक वाढणार्याचे करा आमच्यासारख्या भामटय्यांचे अजिबात कौतुक करू नका थोडा अहमपणा आला तर अहंकार झाल्याशिवाय राहत
गगणगिरी महाराजांकडे विरक्ती होती. ज्ञान होते. म्हणून ते तुमचे आमचे आई नाही वडील नाही तर ते मायबाप आहे.
हा सप्ताह मी केला असे कधीही म्हणू नका गगनगिरी महाराजांनी सर्व अहंकार दूर केला म्हणून त विश्वविभूषित झाले. शास्त्रकृपा, गुरूकृपा, ईश्वरकृपा, अंतःक रण एवढ्या कृपा गगनगिरी महाराजांच्या अंगी होत्या म्हणूनच ते संत झाले. अस ल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी त्रंबकेश्वर येथील जुन्या आख ड्याचे ठाणापती विष्णुपुरी महाराज शिवा नंदगिरी महाराज खा डॉ सुजय विखे आ सत्य जित तांबे डॉ जयश्री थोरात यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले दहीहंडी फोडण्याचा मान निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी संजयगिरी महाराज व गगनगिरी महाराजांचे भक्त कपिल पवार यांना दिला उपस्थितांचे स्वागत सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीप राव शिंदे यांनी केले सूत्रसंचालन पोपट महाराज आगलावे यांनी केले तर आभार संजय महाराज देशमुख यांनी मानले
संजय देशमुख नव्हे तर संजय गिरी महाराज
संगमनेर तालुक्यातील पिपरणे येथील गगनगिरी महाराजांसाठी सर्वस्वी वाहून घेतलेले परमभक्त संजय महाराज देशमुख या नावाने न संबोधता त्यांना इथून पुढे संजय गिरी महाराज या नावाने संबोधले जाईल अशी घोषणा त्रिंबकेश्वर येथील जुन्या आखाड्याचे ठाणापती विष्णूगिरी महाराज आणि शकरांनंदगिरी महाराज यांनी स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह सांगता प्रसंगी जाखुरीत केली

संजय देशमुख नव्हे तर संजय गिरी महाराज