साने गुरुजींच्या विचारांचा वारसा साथी भास्करराव दुर्वे वक्तृत्व स्पर्धेतून प्रवाहित -राजन इंदुलकर
संगमनेर / लोकवेध live न्यूज
मानव विकास मंडळ संचलित, काशेश्वर विद्यालय कसारा दुमाला यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था( बार्टी), पुणे समता दूत प्रकल्प अहमदनगर पुरस्कृत, साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठान संगमनेर आयोजित तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या.132 स्पर्धकांच्या मोठा सहभाग स्पर्धेला लाभला. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना राष्ट्रसेवा दलाचे रत्नागिरी येथील जेष्ठ मार्गदर्शक राजन इंदुलकर यांनी वरील प्रतिपादन केले.
विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या ऊर्जाचा शोध पालक व शिक्षक यांनी घ्यावा. ती ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी त्याला मदत करावी,असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मानव विकास संस्थेचे सुभाष गुंजाळ हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रसेवा दलाचे राज्याचे मा.कायाध्यक्ष राजाभाऊ अवसक यांनी ३९ वर्षे अविरतपणे सुरू असलेल्या स्पर्धेचा धावता आढावा घेतला. या स्पर्धेतून आम्ही विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी निरंतर संवाद जपला.यातून अनेक प्रामाणिक कार्यकर्ते तयार झाल्याचा आनंद आहे असे ते म्हणाले.
परीक्षक म्हणून अविनाश उगले, प्रा. चं.का देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
३ री ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ४ गटात स्पर्धा होऊन प्रत्येकी पाच स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक, सन्मान चिन्ह, १० हजाराची दर्जेदार पुस्तके देऊन गौरविण्यात आले.
काशेश्वर विद्यालयाचे उपाध्यक्ष प्रा राम वर्पे, मुख्याध्यापक भाऊसाहेब शिंदे, शिक्षक अर्जुन वाळके,बाबुराव गायकवाड, हनुमंत उबाळे विचार पिठावर उपस्थित होते. कवी अनिल देशपांडे, प्रा.शुभदा कावळे,प्र.विजय पाटील,मंगल देशमुख, स्मिता देशमुख,ad वनिता साबळे,सुरेखा दिघे,संजय जेडगुले, वंदना मणियार यांनी उत्तम परिक्षण केले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आधारचे समन्वयक सुखदेव इल्हे, बार्टीचे जिल्हा समन्वयक रजत अवसक, काशेश्वर विद्यालयातील सर्व शिक्षक,सेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब पिंगळे तर आभार प्रदर्शन प्रकल्प प्रमुख नम्रता पवार यांनी केले.
